मुंबईतील नेहरू नगर येथील कादरी एज्युकेशन अँड वेलफेअर फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम
रवि निषाद/प्रतिनिधि
मुंबई – कादरी एज्युकेशन अँड वेलफेअर फाऊंडेशन,नेहरू नगर, मुंबई तर्फे मंगळवार रोजी एक महत्वाचा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये मोफत मोतीबिंदू ऑपरेशन व मोफत चष्मे वाटप शिबिराचा समावेश होता. या शिबिरात मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते आणि डोळ्यांची तपासणी करून घेतली. यावेळी स्थानिक शिवसेना (शिंदे गट) आमदार मंगेश कुडाळकर यांनी या शिबिराला भेट दिली व उपक्रमाचे आयोजक सलीम कादरी यांनी सांगितले की, फाउंडेशन अनेक वर्षांपासून असे सामाजिक उपक्रम राबवत आहे. यासोबतच गोरगरीब मुलांच्या शिक्षणाची व पुस्तकांची व्यवस्थाही या शिबिरात करण्यात आल्याने सर्वांनी कौतुक केले.ज्या रूग्णांना ऑपरेशनची गरज आहे त्यांना हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांचे ऑपरेशन करण्यात येणार आहे. समाजासाठी हे अत्यंत फायदेशीर ठरत आहे.