रक्षकचं बनला भक्षक; ५ वर्षाच्या चिमुरडीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या मद्यधुंद शिपाईला पोलीसांनी ठोकल्या बेड्या

Spread the love

रक्षकचं बनला भक्षक; ५ वर्षाच्या चिमुरडीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या मद्यधुंद शिपाईला पोलीसांनी ठोकल्या बेड्या

योगेश पांडे/वार्ताहर 

लोणावळा – लोणवळ्यामधून एक संतापजनक बातमी समोर येत आहे. विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला एका पाच वर्षीय चिमुरडीशी कर्तव्यावर असलेल्या पोलिसानेच अश्लील चाळे केल्याचे समोर आले आहे. कल्याणमधील १३ वर्षीय मुलीवर अमानुष अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. पोलिसांनी चक्र फिरवून आरोपी विशाल गवळी याला अटक केली. ही घटना ताजी असतानाच लोणावळ्यातील या घटनेने समाजमन हेलावले आहे. रक्षकच भक्षक बनल्याने विश्वास तरी कोणावर ठेवावा असा सवाल विचारण्यात येत आहे. आरोपी पोलीस शिपाई सचिन सस्ते याला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नाताळाच्या दिवशी ही घटना घडली. विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला हा प्रकार घडला. कर्तव्यावर असताना हा पोलीस दारूच्या नशेत होता, याचं नशेत त्याने पाच वर्षीय चिमुरडीसोबत अश्लील चाळे केलेत. याप्रकरणी सचिन सस्तेला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. नाताळची सुट्टी असल्यानं पर्यटक विसापूर किल्ल्यावर गर्दी करत होते. म्हणून नराधम पोलीस सस्ते तिथं बंदोबस्तावर होता.

तिथल्याच एका हॉटेलमधून भाकरी घेतली अन त्याने जेवण केलं. त्याच भाकरीचे बिल द्यायला तो हॉटेलमध्ये आला, तेंव्हा मात्र तो दारूच्या नशेत होता. त्यावेळी तिथं पाच वर्षीय चिमुरडीला सस्ते ने पाहिले. लघुशंकेचा बहाणा करून तो हॉटेलच्या मागे गेला अन चिमुकलीसोबत अश्लील चाळे केले. मुलीने विरोध केला, मग तुला चॉकलेट देतो हे कोणाला सांगू नकोस असं तो तिला म्हणाला. मात्र घडला प्रकार मुलीने आईला सांगितला अन या नराधम पोलीस रस्तेचं बिंग फुटलं. ज्या लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तो कार्यरत होता, त्याचं पोलिसांनी त्याला अटक केली. वर्दीतील नराधमाने हा अन्याय केला. मी त्या पोलिसाला जेवायला दिलं. मी शेतात गेले. तर मुलगी वाळूच्या ढिगाऱ्यावर खेळत होती. तेव्हा पोलिसाने तिला हॉटेलच्या पाठीमागे नेले आणि असा प्रकार केला. पोलिसानेच असे कृत्य केल्यावर आम्ही न्याय तरी कुणाकडे मागवा, असा हंबरडा मुलीच्या आजीने फोडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon