उल्हासनगर, अंबरनाथ परिसरात ढाबे व चायनीज कॉर्नरमध्ये विनापरवाना दारूविक्री करणाऱ्यावर कारवाई करा – प्रकाश संकपाळ

Spread the love

उल्हासनगर, अंबरनाथ परिसरात ढाबे व चायनीज कॉर्नरमध्ये विनापरवाना दारूविक्री करणाऱ्यावर कारवाई करा – प्रकाश संकपाळ

पोलीस महानगर नेटवर्क

अंबरनाथ – उल्हासनगर, अंबरनाथ परिसरात ढाब्यावर खुलेआम दारूच्या बाटलयांची रेलचेल पहायला मिळत आहे. अधिकाऱ्यांचा वरदहस्त किंबहूना डोळेझाकपणामुळे ढाब्यांवर विनापरवाना, बेकायदेशीररित्या दारू विक्री करण्यात येत असल्याने उल्हासनगर,बदलापूर, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ सह आजूबाजूच्या शहरातील राज्य उत्पादन शुल्क विभाग रडारवर आला आहे. याबाबत श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष व राष्ट्रीय भ्रष्टाचार व अपराध निवारक परिषदेचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रकाश संकपाळ यांनी थेट उपअधीक्षक व्ही.व्ही.वैद्य, ठाणे मुख्यालय, यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले असून भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. यावेळी दैनिक पोलीस महानगर चे कार्यकारी संपादक प्रकाश संकपाळ, प्रतिनिधी चंद्रा पी. मौर्या सुधीर गुजर उपस्थित होते.

उल्हासनगर अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, डोंबिवली आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर हॉटेल्स, ढाबे, चायनीज कॉर्नर असून त्याठिकाणी विनापरवाना, बेकायदेशीररीत्या दारूची विक्री करण्यात येत आहे. विशेष म्हणजे परवानगी नसताना तिथे अल्पवयीन मुले मद्य प्राशन करत असल्याने गुन्हेगारी मध्ये प्रचंड वाढ होत आहे. नियमितपणे तपासणी आणि धाडसत्र करण्यात येत नसल्याने त्याला जबाबदार राज्य उत्पादन शुल्क असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

शहरात रात्री अपरात्री सुरू राहणाऱ्या डान्स बार, हॉटेल्स, धाबे, चायनीज कॉर्नर यावर कायदेशीर कारवाई केली जावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे.

कारवाई करणार – व्ही.व्ही.वैद्य, उपअधीक्षक, मुख्यालय

उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, कल्याण परिसरात चालणारे ढाबे, चायनीज कॉर्नर, डान्स बार, हॉटेल्स यात जे कुणी नियम कायद्याचे उल्लंघन करताना मिळून आल्यास हॉटेल्स, डान्सबार, ढाबे कायमस्वरूपी सील करण्यात येणार असे आश्वासन राज्य उत्पादन शुल्क, ठाणे उपअधीक्षक व्ही.व्ही.वैद्य यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon