मनपाच्या रस्त्यावर बेकायदा इमारत बांधून मॅन रियल्टरनी कमावले १००० करोड
रवि निषाद/प्रतिनिधि
मुंबई – घाटकोपर पूर्वेकडील महानगर पालिका एन विभागाच्या हद्दीत असलेल्या नायडू कॉलनीमध्ये मॅन रियल्टर अँड होल्डिंग प्रा.लि. पालिकेच्या आरक्षित असलेल्या रस्त्यावर १९४०.७६ चौरस मीटर जागेत खाजगी इमारत बांधली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. याबाबत अब्दुल रज्जाक मुल्ला यांनी त्यांच्या वकिलामार्फत सर्व संबंधित विभागांकडे तक्रार केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल रज्जाक मुल्ला यांनी दिलेल्या तक्रारीवरून मॅन रियल्टर अँड होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेडने नायडू कॉलनीतील १५९ ते १७२ इमारतींची सोसायटी पाडून त्या जागी इमारत पुनर्विकास अंतर्गत एक मोठे कॉम्प्लेक्स बांधले आहे, ज्यामध्ये सुमारे १४ इमारतींचा समावेश आहे. ज्या महानगरपालिकेला रस्ता त्यानी आपल्या कब्जात घेतला आहे तो ६० फूटचा रस्ता होता, ज्याचे एकूण क्षेत्रफळ १९४०.७६ चौरस मीटर होते आणि त्या भूखंडावर बेकायदेशीर इमारत बांधून विकासकाने जवळपास १००० कोटी रुपयांचा नफा कमावला असल्याचे दिसून येत आहे. अब्दुल रज्जाक मुल्ला यांनी सांगितले की, आम्हाला त्या रस्त्याचा डीपी प्लॅन महानगरपालिका विभागाकडून मिळाला असून तो आजही रस्त्याच्या स्वरुपात दिसत आहे. पण, मन रिअल्टरने तो रस्ता गायब केला आणि तिथे एक आलिशान कॉम्प्लेक्स उभे केले आहे. या प्रकरणाबाबत अधिवक्ता नितीन धनडोरे यांच्यामार्फत सर्व संबंधित विभागांना लेखी तक्रार देऊन मन रियल्टरवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत मुल्ला हे म्हणाले आहेत की, जोपर्यंत या प्रकरणाशी संबंधित सर्व संबंधित अधिकारी आणि मन रियल्टरच्या ऑपरेटरवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही याप्रकरणी लढा देत राहू तसेच गरज पडल्यास येत्या काही दिवसांत मुल्ला यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारीही केली असल्याचे दैनिक ‘पोलीस महानगर’ च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.