पत्नीचा खून करून फरार झालेल्या आरोपीला चेन्नईतून ठोकल्या बेड्या, ट्रॉम्बे पोलिसांची कामगिरी

Spread the love

पत्नीचा खून करून फरार झालेल्या आरोपीला चेन्नईतून ठोकल्या बेड्या, ट्रॉम्बे पोलिसांची कामगिरी

रवि निषाद/प्रतिनिधि

मुंबई – ट्रांबे पोलिसांच्या हद्दीत रहणारा एका युवकाने आपल्या पत्नीची हत्या करुन तो फरार झाला होता. मुंबई ते दिल्ली आणि दिल्ली ते चेन्नई असा प्रवास करुन तो तरुण चेन्नईमध्ये लपून बसला असता माहिती ट्रांबे पोलिसांना मिळताच त्यांनी पाठलाग करुन त्याला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३९ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ०९:३० वाजताच्या सुमारास ट्रांबे पोलिस स्टेशनच्या हद्दीत रूम नंबर १६, शिव ज्योत चाळ, ज्योतिबा मंदिराजवळ, महाराष्ट्रनगर, मानखुर्द येथे अमोल श्रीरंग पवार आणि त्याची पत्नी राहत होते आणि अमोल दर रोज दारूच्या नशेत घरी येऊन पत्नीला मारहाण करत होता. यातील फिर्यादी यांच्या बहिणीची मुलगी ही अधून मधून फिर्यादी यांच्या घरी येत असायची. त्यावेळी ती त्यांना सांगत होती की तिचा पती अमोल हा काही कामधंदा करत नाही तसेच त्यास दारू पिण्याचे व्यसन असल्याने तो तिच्याकडे सतत दारू पिण्यासाठी पैसे मागत होता व पैसे न दिल्यास दारूच्या नशेत तिला मारहाण करत होता. फिर्यादी यांच्या गावावरून दिराचा मुलगा मयूर याला फोन करून सांगितले की, मयत महिलेच्या नवऱ्याने त्याच्या पत्नीचा गळा दाबून जीवे ठार मारून टाकले असून तो सुद्धा आत्महत्या करण्यासाठी पुणे येथे जात असल्याचे त्याने त्याला तसेच इतर नातेवाईकांना फोन करून सांगितले आहे. तरी तू त्याच्या घरी जाऊन बघून घे.तेव्हा फिर्यादी व त्यांचा मुलगा मयूर हे मयताच्या घरी गेले असता तिच्या घराला बाहेरून कडी होती त्यांनी कडी उघडून पाहिले असता मयत ही जमिनीवर असलेल्या गादीवर उताणे अवस्थेत स्थितीत पडलेली दिसून आली. त्यांनी तिला आवाज देऊन उठवण्याचा प्रयत्न केला परंतु तिने कोणताही प्रतिसाद दिला नाही त्यामुळे त्यांनी लगेच त्यांच्या मुलास पोलीस ठाणेस माहिती देण्यासाठी पाठवून दिले. काही वेळातच त्यांचा मुलगा व पोलीस तेथे पोहोचल्याने बेशुद्ध अवस्थेतील महिलेस राजावाडी रुग्णालय येथे घेऊन गेले असता डॉक्टरांनी तिला दाखलपूर्व मयत घोषित केले. तरी अमोल पवार यांनी कौटुंबिक वादातून त्याची पत्नी हिचा गळा दाबून जीवे ठार मारले म्हणून फिर्यादी यांनी दिलेल्या जबाबावरून गुन्हा नोंद करण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी अमोल श्रीरंग पवार याने पत्नीचा खून करून फरार झाल्याने पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी तत्काळ सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी याचा शोध घेऊन अटक करण्यासाठी व.पो.नि.वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ ६ मधील गुन्हे प्रकटीकरण अधिकारी यांचा समावेश असलेल्या विशेष पथकाची स्थापना केली.त्यानुसार पथकाने आरोपी बाबत गोपनीय माहिती प्राप्त करून नवी दिल्ली या ठिकाणी आरोपीचा शोध घेतला परंतु आरोपी आपली अटक वाचविण्यासाठी सतत वेगवेगळ्या राज्यात फिरत होता,त्यानुसार त्याचा शोध घेत असताना पाहिजे आरोपी हा चेन्नई या ठिकाणी असल्याबाबत तांत्रिक विश्लेषण करणाऱ्या टीमने माहिती दिली त्यानुसार दिनांक ६, डिसेंबर, २०२४ रोजी विशेष पथकाने एम.जी.आर.रेल्वे स्टेशन, चेन्नई,राज्य तामिळनाडू येथून आर.पी.एफ.पोलीस पथकाच्या मदतीने पाहिजे आरोपी अमोल श्रीरंग पवार यास ताब्यात घेऊन नमूद गुन्ह्यात अटक केली आहे. अटक आरोपीचे नाव अमोल श्रीरंग पवार (३६) आहे.सदर गुन्हाचा तपास म.पो.नि.मंदाकिनी चोपडे व पोउपनि सादिक शेख आणि ट्रांबेचे डैशिंग पीएसआई शरद नानेकर यानी अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग डॉ महेश पाटिल आणि दक्ष पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहायक पोलीस आयुक्त राजेश बाबशेट्टी, स.पो.आ.देवनार विभाग, वपोनी गंगाराम वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली खाली पो.नि. मानसिंग पाटील (गुन्हे) ,स.पो.नि. सुशील लोंढे व ए.टी.सी. पथक, पो.उप.नि. शरद नाणेकर व गुन्हे प्रकटीकरण पथक, पो.उप.नि. भाऊसाहेब माळवदकर व गुन्हे प्रकटीकरण पथक,पो.उप.नि. अभय काकड व गुंडा पथक,पो.उप.नि.डमरे व पथक (चुनाभट्टी पो.ठाणे), पो.उप.नि.देशमुख

पथक, (टिळकनगर पो.ठाणे) ,पो.उप.नि.खैरनार व पथक (आर.सी.एफ.पोलीस ठाणे), पो.उप.नि. बगाडे व पथक (गोवंडी पोलीस ठाणे) तांत्रिक तपास पो.उप.नि.ऋषिकेश बाबर, पो.उप.नि.अजय गोल्हार आणि पो. ह. दशरथ राणे यानी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon