जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्यासह पाच जणांवर विनयभंग व मारहाण प्रकरणी मंगळवेढ्यात गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
मंगळवेढा – जिल्ह्यातील लोक मला घाबरतात मी बऱ्याच जनांना कामाला लावले आहे. असे म्हणून मारहाण करून ७ लाखाचे पाणी फिल्टर सामान व १ लाखाचे मोबाईल चोरून नेल्याप्रकरणी जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्यासह ५ जणांवर विनयभंग व मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची फिर्याद बाबुराव दादासो बर्गे (वय ३३ रा.लक्ष्मी दहीवडी) यांनी दिली असून फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा शुद्ध पाणी विकण्याचा व्यवसाय असून तो सांगोला येथे व्यवसायासाठी गेला असता ५ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता फिर्यादीच्या पत्नीने फोनवर कंपनीतील मशिनरी काही लोक घेवुन जात असल्याचे सांगितल्यानंतर फिर्यादी तात्काळ घटनास्थळी आला असता त्यावेळी प्रभाकर देशमुख, (रा.पाठकुल ता. मोहाळ), किरण जाधव, राधिका किरण जाधव, दोघे (रा.सिध्देवाडी), दत्ता पवार, (रा.बेगमपुर), जक्काप्पा शेजाळ (रा.हुलजंती), इतर अनोळखी तीन ते चार लोक तिथे होते.
या दरम्यान झालेल्या वादातून प्रभाकर देशमुख याने फिर्यादीच्या गचांडीला धरुन तु मला ओळखले नाही का ? जिल्ह्यात अनेकाला कामाला लावले आहे पाणी फिल्टरची मशिनरी राधिकाला दे म्हणत मारहाण करण्यास सुरुवात केली. तर किरण जाधवने तुला लय मस्ती आली आहे तुझा माज उतरवितो, असे म्हणून पाईपने मारहाण केली. फिर्यादीची बहीण राधिका जाधव, दत्ता पवार, जक्काप्पा ऊर्फ भैया शेजाळ यांनी कंपनीतील पाण्याच्या प्लास्टीक पाईपने पाठीवर मारहाण केली व शिवीगाळ सुद्धा करित होते. या भांडणात फिर्यादीची पत्नी मध्ये आल्यावर राधिका जाधवने तिचे केस ओढून मारहाण केली. या दरम्यान प्रभाकर देशमुख यांनी फिर्यादीच्या पत्नीच्या अंगास हात लावुन तिच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले. या दरम्यान तिच्या गळ्यातील ३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण कोठेतरी पडुन गहाळ झाले. वडील दादा बर्गे यांना देखील मध्ये आल्यानंतर आरोपी लोकांनी मारहाण केली. यावेळी दोन पांढऱ्या पिकअप व त्यातून ७ लाख किमतीची पाणी शुद्धीकरणाशी संबंधित मशिनरी घेवुन गेले. जाताना कंपनीतील सर्व वायरिंग तोडून पाईपचे नुकसान केले. फिर्यादीचे लाखाचे दोन मोबाईलचेही नुकसान केले मध्ये आला तर तुला व तुझ्या कुटुंबाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमुद केले. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद लातूरकर हे करीत आहेत.