शिवशाही बस उलटून भीषण दुर्घटना, ८ मृतदेह काढले बाहेर, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

Spread the love

शिवशाही बस उलटून भीषण दुर्घटना, ८ मृतदेह काढले बाहेर, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

योगेश पांडे/वार्ताहर 

गोंदिया – शिवशाही बसचा भीषण अपघात होऊन काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना गोंदियात घडलीय. सडक अर्जुनी इथं शिवशाही उलटून हा अपघात झालाय. अपघातग्रस्त बसमधील जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांचा आकडा अद्याप समजलेला नाही. घटनास्थळी पोलीस आणि प्रशासन दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. बस नागपूरकडून गोंदियाच्या दिशेने जात असताना रस्त्यावर उलटली. खजरी व डव्वा गावाजवळ हा अपघात झाला. या अपघातात १० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. ७ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर अद्याप ५ ते ७ मृतदेह बसमध्ये असल्याची माहिती समजते.

गोंदिया जिल्ह्यातल्या सडक अर्जुनी तालुक्यात खजरी गावाजवळ शिवशाही बस उलटलीय. भीषण अपघातात बसमधील प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात किती लोकांचा मृत्यू झालाय याची माहिती समजू शकलेली नाही. प्राथमिक माहितीनुसार एक ते दोघांचा मृत्यू झाला आहे. पण अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon