६० वर्षीय दागिने चोर महिलेला अटक
रवि निषाद/प्रतिनिधि
भाईंदर – भावनिक आवाहन करून एका ८० वर्षाच्या जेष्ठ नागरिकांची फसवणूक करून तिचे सोन्याचे दागिने चोरल्याप्रकरणी एका ६० वर्षीय महिलेला एमएचबी कॉलनी पोलिसांनी अटक केली आहे.
भाईंदरमध्ये राहणाऱ्या गीता पटेलच्या विरोधात आता पर्यंत १० एफआयआर दाखल करण्यात आले आहेत, सदर घटना १३ नोव्हबर रोजी घडली आहे. १३ आणि १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.१५ च्या सुमारास पटेल यांनी तक्रारदाराशी संपर्क साधला आणि तक्रारदाराला तिच्याबद्दल सहानुभूती वाटली एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर जाऊन त्याला तिची गरीब आर्थिक परिस्थिती दाखविण्याचा दावा केला, त्याऐवजी त्याला गुन्हेगारी प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन दीड लाख रुपयांची सोनसाखळी चोरली होती. त्या पीड़ित वृद्धाच्या तक्रारीवरुन एमएचबी कॉलोनी पोलिसांनी त्या ६० वर्षीय चोरांनी महिलेला अटक करुन अधिक तपास करीत आहेत.