नवनागापूर, एमआयडीसी येथील नागरी वस्तीमध्ये चालणाऱ्या कुंटणखान्यावर छापा,४ आरोपीविरूध्द गुन्हा दाखल
अहिल्यानगर – राकेश ओला, पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत. सदर आदेशान्वये पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव व पोलीस अंमलदार संदीप पवार, विजय ठोंबरे, अतुल लोटके, संतोष खैरे, अमृत आढाव, भाग्यश्री भिटे यांचे पथक तयार करुन त्यांना अवैध धंद्याची माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना देवुन पथकास रवाना केले होते.
तपास पथक दिनांक ७ नोव्हेंबर, २०२४ रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्याची माहिती काढत असतांना पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव यांना गुप्त बातमीदारा मार्फत आंधळे चौरे नगर, नवनागापूर, एमआयडीसी येथे एका रो-हाऊसिंगमध्ये दोन इसम महिलाकरवी कुंटणखाना (वेश्याव्यवसाय) चालवित आहे.अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने तपास पथकाने सदरची माहिती एमआयडीसी पोलीस स्टेशन यांना देऊन, त्यानंतर तपास पथक व पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, तोफखाना पोलीस स्टेशन, सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी व पोलीस अंमलदार सुचित्रा सुर्यवंशी, सोनाली जाधव, सुधीर गवारे नेम.एमआयडीसी पोलीस स्टेशन अशांचे संयुक्त पथक तयार करून छापा कारवाई करणेबाबत रवाना झाले. तपास पथकाने आंधळे चौरे कॉलनी, नवनागापूर, एमआयडीसी येथील सोसायटीमध्ये चालणाऱ्या कुंटणखान्यावर खात्री करण्याकरीता पथकातील पोलीस अंमलदार बनावट ग्राहक म्हणुन पाठविले.तपास पथकाने नमूद ठिकाणी वेश्याव्यवसाय चालू असलेबाबत खात्री पटल्यानंतर पंचासमक्ष छापा टाकुन रौ-हाऊसिंगमधील १) किरण रावसाहेब जरे, वय ४०, रा.वारूळाचा मारूती, नालेगाव, अहिल्यानगर २) बाबासाहेब प्रभाकर जाधवर, वय ३६, रा.श्रीपतवाडी, पो.घाटशीळ पारगाव, ता.शिरूर, जि.बीड यांना ताब्यात घेऊन पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता, आरोपीच्या ताब्यातुन ४०,०००/- रूपये किंमतीचे दोन मोबाईल, १,०००/- रूपये रोख रक्कम, आरोपीचे ताब्यातील ५,००,०००/- रू किंमतीची हुंदाई एक्सेंट कार क्रमांक एमएच-१७-बीव्ही-४३०९ असा एकुण ५,४१,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीेसह रौ-हाऊसिंगची पाहणी करता त्यामध्ये २ पिडीत महिला मिळून आल्या. सदर महिलाकडे विचारपुस करता त्यांनी आम्हास वेश्या व्यवसाय करून ग्राहकाकडून पैसे घेऊन, त्यामधुन आम्हास काही पैसे देतात व उर्वरीत रक्कम स्वत:कडे ठेऊन, आमचेकडून वेश्याव्यवसाय करून घेतात. वेश्याव्यवसायातून मिळणाऱ्या पैशावर आमची उपजीविका चालते, अशी माहिती सांगीतली. पथकाने टाकलेल्या छाप्या दरम्यान मिळून आलेल्या २ पिडीत महिलांची सुटका करण्यात आली.
तपास पथकाने नवनागापूर, एमआयडीसी परिसरातील नागरी वस्तीमध्ये येथे छापा टाकुन केलेल्या कारवाईमध्ये आरोपी १) किरण रावसाहेब जरे, वय ४०, रा.वारूळाचा मारूती, नालेगाव, अहिल्यानगर, २) बाबासाहेब प्रभाकर जाधवर, वय ३६, रा.आंबेडकर चौक, सनफार्मा शाळेजवळ, बोल्हेगाव, एमआयडीसी, अहिल्यानगर ३) राणी उर्फ ललिता बाळासाहेब ठुबे, रा.आंबेडकर चौक, नवनागापूर, अहिल्यानगर (फरार) व ४) संगिता शिवाजी जगताप, रा.आंधळे चौरे कॉलनी, नवनागापूर, एमआयडीसी, अहिल्यानगर (फरार) असे संगनमताने स्वत:चे आर्थिक फायदयाकरीता २ महिलांकडून कुंटणखाना चालवून त्यातून मिळणाऱ्या पैशामधुन आपली उपजिवीका करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. वरील आरोपीविरूध्द मपोहेका/२२३३ भाग्यश्री गंगाधर भिटे, नेम.स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ८०४/२०२४ स्त्रिया व मुली यांचे अनैतिक व्यापारास (प्रतिबंध) कायदा १९५६ चे कलम ३, ४, ५, ७, ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशन हे करीत आहेत. सदरची कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, प्रशांत खैरे, अपर पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर व संपतराव भोसले, नगर ग्रामीण उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, तोफखाना व एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.