चेंबूरमध्ये लाखों किंमत्तीच्या अंमली पदार्थसह दोघे ताब्यात, गुन्हे शाखा युनिट-६ ची कामगिरी
रवि निषाद/प्रतिनिधि
मुंबई – चेंबूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन आरोपींना अटक करुन त्यांच्या कडून एक लाख ३९ हजार ७२५ रूपयेचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे शाहरुख अनवर जमादार, वय (२२) वर्ष व शाहिल अखिल शेख, वय (२३) वर्ष सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ४ नोव्हेंबर, रोजी संध्याकाळी पावणे आठ च्या सुमारास कक्ष-६ कार्यालयाचे पोलिस निनिरीक्षक भरत घोणे, सहायक पोलिस निरीक्षक गावडे, चिकणे, पोलिसउपनिरीक्षक सावंत, सहायक फौजदार देसाई पोलिस हवलदार चव्हाण, घेरडे,भालेराव,महिला पोलिस शिपाही अभंग आणि जायभाय यानां गुप्त सुचना प्राप्त झाली की, काही लोक अंमली पदार्थ विक्री करिता येणार आहेत. वरिष्ठांच्या आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी गस्त करीत असताना, सदर ठिकाणी मानखुर्द रेल्वे स्टेशन समोर, मानखुर्द पश्चिम मुंबई येथे २ पुरुष इसमा बाबत संशय आल्याने त्यास पोलीस पथकाने थांबवण्याचा प्रयत्न केला असता, सदर पुरुष हे पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले त्यावेळी पथकाने त्यांना घेराव घालून ताब्यात घेतले. त्यानंतर दोन पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे अनरेक्स एचसीएल सिरप या अंमली पदार्थाच्या बाटल्या दोघांकडे मिळून आल्या. सदर आरोपींकडे असलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्याबाबत सविस्तर पंचनामा करण्यात आला आहे. सदर अंमली पदार्थ विक्रीकरिता स्वतःच्या ताब्यात बाळगला म्हणून फिर्यादी यांनी सरकारतर्फे दिलेल्या तक्रारीवरून सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ताब्यातील २ पुरुष इसम व जप्त मुद्देमाल पुढील कार्यवाही करिता मानखुर्द पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. मानखुर्द पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.