ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा

Spread the love

ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा

योगेश पांडे/वार्ताहर 

ठाणे – ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर झाला आहे. कर्मचाऱ्यांना २४००० रुपये एवढा सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केली. याप्रसंगी खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेवक विकास रेपाळे, नम्रता भोसले, मीनल संख्ये, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि प्रशांत रोडे, उपायुक्त जी. जी. गोदेपूरे आणि उमेश बिरारी उपस्थित होते. ठाणे महानगरपालिकेने सन २०२२-२३ साठी २१ हजार ५०० रुपये इतके सानुग्रह अनुदान दिले होते. त्यात २५०० हजार रूपयांची वाढ करून २४००० देण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.

दिवाळीच्या निमित्ताने शासकीय तसेच निमशासकीय कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केला जातो. ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना २०२१-२२ मध्ये १८ हजार रुपये बोनस मिळाला होता. गेल्या वर्षी यामध्ये २० टक्के वाढ करण्यात आली होती. तर आशा सेविकांना ६००० रुपये जाहीर झाले होते. भाऊबीज आणि सानुग्रह अनुदानात यंदाही वाढ करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंद दिसत आहे. ठाणे महानगरपालिकेने २०२१-२१ साठी १८ हजार बोनस म्हणून दिले होते. त्यानंतर त्यात ३५०० रुपयांची वाढ करुन २०२२-२३या वर्षासाठी २१५०० रुपये देण्यात आले. त्यानंतर यंदा २५०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. बोनस जाहीर झाल्याने ठाणे मनपाच्या कर्मचारी यांनी आणि मजदूर युनियनचे सरकारचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon