शिवाजी नगर डम्पिंगमध्ये कचरा उचलण्यासाठी गेलेला तरुण बेपत्ता
रवी निषाद/प्रतिनिधी
मुंबई – गोवंडी शिवाजी नगर येथे राहणारा ३१ वर्षीय तरुण गेल्या ४ दिवसांपासून बेपत्ता आहे. त्याच्या बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी ७ ऑक्टोबर रोजी शिवाजी नगर पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली होती. बेपत्ता तरुणाचे नाव सफीकुल्ला अमिरुल्ला खान (३१) असल्याचे सांगण्यात येत आहे.
शिवाजी नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्लॉट क्रमांक ४ रोड क्रमांक १३ शास्त्रीनगर येथे राहणारा सफिकउल्ला खान हा ७ ऑक्टोबर रोजी सकाळी नेहमीप्रमाणे येथील डम्पिंग ग्राऊंडवर कचरा उचलण्यासाठी गेला असता तो घरी परतला नाही रात्री उशिरापर्यंत त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला,तेव्हा सफिकउल्लाचा ठावठिकाणा लागला नाही,तेव्हा त्याच्या कुटुंबीयांनी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात एएमआर क्रमांक २३०/२०२४ नुसार गुन्हा दाखल केला.पोलिसांनी सामान्य जनतेला आवाहन केले आहे की,जर कोणाला सफिकबद्दल काही माहिती असेल तर त्यांनी निनावीपणे पोलिसांना कळवावे आणि आम्ही सफिकउल्ला खानला शोधण्याचा प्रयत्न करू.