तारापूर मध्ये मॅककॉय फार्मा कारखान्यात महिलांच्या सुरक्षेची ऐसी की तैसी ! सुरक्षे अभावी महिलचे बोट गमावले

Spread the love

तारापूर मध्ये मॅककॉय फार्मा कारखान्यात महिलांच्या सुरक्षेची ऐसी की तैसी ! सुरक्षे अभावी महिलचे बोट गमावले

प्रमोद तिवारी

बोईसर – तारापूर औद्योगिक क्षेत्रात असलेल्या मॅककॉय फार्मा प्रा. लि. भूखंड क्रमांक एस १२ मध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणारी महिला कामगार पार्वती शंभू यादव (वय ४७) हीचे हाताचे बोट स्टँडच्या पंख्यात गेल्याने ते कापले गेले घटना घडल्या नंतर तिला बोईसर येथील संजीवनी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार पार्वती शंभू यादव आणि ठेकेदार यांच्यात झालेल्या करारानुसार पार्वती यादव ही पॅकिंग विभागात काम करत होती. २७ सप्टेंबर २०२४ रोजी पार्वती शंभू यादव नेहमीप्रमाणे मॅककॉय फार्मा प्रा. लिमिटेड ह्या कारखान्यात कामावर हजर होती. त्याच दिवशी सकाळी ८:३० च्या सुमारास कारखान्यातील पर्यवेक्षकांनी (सुपरवायझर) ह्यांनी पार्वती यादव हिला बाजूला असलेला स्टँड पंखा त्या ठिकाणाहून हलविण्यास सांगितले , परंतु पर्यवेक्षकाने सांगितलेले काम लगेच करावे नाहीतर आपल्याला ओरडेल ह्या भीतीने व काही कारणास्तव पार्वतीने तो फॅन उचलला असता तिच्या उजव्या हाताच्या अंगठ्याजवळील बोट पंख्यामध्ये अडकल्याने ते बोट कापले गेले.

घटना घडल्यानंतर पार्वतीला उपचारासाठी नजीकच्या संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले व तिला ५ ऑक्टोबर २०२४ रोजी रुग्णालयातून सोडण्यात आले आणि नंतर बोटाच्या उपचारासाठी तिला १० ऑक्टोबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले आहे. सदर घटनेची माहिती संजीवनी हॉस्पिटलने बोईसर पोलिस ठाण्याला दिलीअसता बोईसर पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन पार्वतीचा जबाब घेऊन एमएलसीची नोंद केलीआहे.

घटनेची माहिती मिळताच संजीवनी हॉस्पिटल मध्ये जाऊन पार्वती शंभू यादव यांची भेट घेतली असता पार्वतीने संभाषणात जे सांगितले ते अतिशय धक्कादायक आहे. ह्या कारखान्यात अनेक महिला ठेका पद्धतीने काम करत आहेत, मात्र साडेनऊ तासांचे काम करून त्यांना केवळ तीनशे रुपये पगार दिला जातो.

नारी सक्षमीकरण गेले कुठे?

कामगार कायद्यानुसार कामगारांना नियमानुसार इतर सुविधांपासून वंचित ठेवले जात असून, एखादी महिला कर्मचारी सुट्टीच्या दिवशी ड्युटीवर गेल्यास तिला सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत २६० रुपये वेतन दिले जाते, नियमाप्रमाणे सुट्टीच्या दिवशी कर्तव्य बजावण्यासाठी अधिक पगार दिला जातो, तर केंद्र सरकारने सारख्या कामासाठी समान वेतन कायदा लागू केला आहे, ज्यामध्ये पुरुष आणि महिला कामगारांना सारखे वेतन मिळायला हवे, त्यात कोणताही भेदभाव नसावा, परंतु या कारखान्यात महिला कामगारांच्या बाबतीत मोठा भेदभाव केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्र राज्याच्या कामगार मंत्रालयाने जारी केलेल्या किमान वेतन देय कायद्याचे पालन केले जात नाही, कंपनी मालक व ठेकेदाराकडून महिला कामगारांची पिळवणूक केली जात आहे,

कामगारांना हक्काच्या सुविधा मिळतात का ?

कामगारांना किती वेतन दिले जात आहे? वेतनापासून, इतर सर्व प्रकारच्या सुविधा कामगारांना नियम व अटींनुसार पुरविल्या जातात का? कामगारांच्या बाबतीत सुरक्षा व्यवस्था चोख आहे का ? व इतर बाबींची कामगार उपायुक्त कार्यालय, पालघर आणि औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग, पालघर यांनी चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करून शोषित कामगारांना न्याय मिळवून द्यावा अशी सर्व कामगार वर्ग व नागरिकाकडून मागणी होताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon