धक्कादायक ! एकाच कुटुंबातील चौघांची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अस्पस्ट

Spread the love

धक्कादायक ! एकाच कुटुंबातील चौघांची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अस्पस्ट

पोलीस महानगर नेटवर्क

नागपूर – नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यातील मोवाड गावातून एक धक्कादायक व खळबळजनक बातमी समोर येत आहे. मोवाड गावातील एकाच कुटुंबातील चार व्यक्तींनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवल्याची घटना घडली आहे. एकाच घरातील चौघा जणांचे मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ माजली. मृतांमध्ये पती, पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांचा समावेश असून त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये विजय पचोरी (वय ६८), त्यांची पत्नी मालाबाई पचोरी (वय ५५), मुलगा दीपक पचोरी (वय ३८) व गणेश पचोरी (वय ३८) यांचा समावेश आहे. सदर घटना समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा करत मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. कुटुंबातील या सर्वांनी सामूहिक आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. मात्र यामुळे मोवाड गावात भीतीचे वातावरण आहे. या घटनेची माहिती मिळताच नागपूर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच फॉरेन्सिकची टीमही घटनास्थळी दाखल झाली.

या कुटुंबाने आयुष्य का संपवले असावे, ही आत्महत्या आहे की हत्या असे बरेच प्रश्न उपस्थित होत असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. अकस्मात घडलेल्या या घटनेमुळे त्या कुटुंबियांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावकरी हळहळ व्यक्त करत आहेत. पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon