धुळे-सोलापूर महामार्गावर माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या मुलीचा अपघात; फॉर्च्युनरला पिकअप वाहनाची धडक
योगेश पांडे/वार्ताहर
संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगरमधून अपघाताची एक बातमी समोर आली आहे. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची मुलगी संजना जाधव यांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. धुळे-सोलापूर महामार्गावरील चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव येथे हा अपघात झाल्याची माहिती पुढे आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पिकअप चालकाने जाधव यांच्या चालकाच्या बाजूने समोरून येत धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. मात्र सुदैवाने या अपघातात संजना जाधव, चालक आणि इतर कार्यकर्ते थोडक्यात बचावले आहे. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची मुलगी संजना या कन्नड येथून आगामी विधानसभा निवडूनक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान त्यांच्या गाडीचा अपघात झाल्याने अनेक चर्चा आता रंगू लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संजना जाधव या आगामी विधानसभा निवडूनक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. दरम्यान त्यांनी जिल्ह्यात नागरिकांच्या गाठीभेटी वाढवल्या आहे. त्याच पार्श्वभूमीवर संजना जाधव या आपल्या कारने धुळे-सोलापूर महामार्गावरुन जात होत्या. दरम्यान चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव जवळ त्यांची गाडी आली असता समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाने त्यांच्या कारला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की त्यात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थाळ गाठून पुढील कारवाई सुरू केली आहे. मात्र सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झाली नसून संजना जाधव, चालक आणि इतर कार्यकर्ते थोडक्यात बचावले आहे.