भिवंडी महापालिकेतील लाचखोर लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
भिवंडी – भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेतील लिपिकास दहा हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे यांनी रंगेहात पकडले आहे.पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव अजय गायकवाड असे आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या आईच्या नावावर असलेली घरपट्टी तक्रारदार यांच्या नावावर करण्यासाठी त्यांनी प्रभाग समिती क्र.४ येथे अर्ज केला होता. सदरची घरपट्टी नावावर करून देण्यासाठी अजय गायकवाड यांनी तक्रारदार यांच्याकडे २०,०००/- रूपये लाचेची मागणी केली होती. त्याअनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या पडताळणी कारवाईत अजय गायकवाड यांनी तक्रारदार यांच्याकडे २०,०००/- रू. दयावे लागतील असे सांगून प्रथम १०,०००/- रूपये व काम झाल्यानंतर १०,०००/- रूपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भिवंडीत सापळा रचून अजय गायकवाड यांना तक्रारदार यांच्याकडून १०,०००/- रूपये लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले.