मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर ट्रक चालकांना लुटणाऱ्या ५ दरोडेखोरांना पनवेल पोलिसांकडून जेरबंद

Spread the love

मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर ट्रक चालकांना लुटणाऱ्या ५ दरोडेखोरांना पनवेल पोलिसांकडून जेरबंद

पोलीस महानगर नेटवर्क

नवीन पनवेल – राज्यात ठिकठिकाणी लूटमार, दरोडेखोरी, फसवणूक, महिलांवर अत्याचार अशा अनेक गुन्हेगारीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अशीच एक लुटमारीची घटना मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर घडली आहे.मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर ट्रक चालकाला लुटणाऱ्या पाच दरोडेखोरांना पनवेल तालुका पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पाच मोबाइल फोन आणि ७ हजार रुपये जप्त केले आहेत. रोहन उर्फ गुड्डू गोपीनाथ नाईक (वय २४), रोहिदास पवार (वय २३), आतेश वाघमारे (वय २६), मनीष वाघमारे (वय ३५), शंकर चंदर वाघमारे (वय १८, सर्व रा. निंबोडेवाडी, खालापूर) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता २० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या गुन्ह्यातील फरार झालेल्या तीन आरोपींचा शोध सुरू आहे.

ट्रकवरील चालक गेंदलाल पटेल हा लघुशंकेसाठी पळस्पे हायवे पोलिस चौकीच्या २०० मीटर पुढे थांबला असताना चोरट्यांनी ९ सप्टेंबर रोजी त्याला हाता बुक्क्यांनी मारहाण करून मोबाइल आणि रोख रक्कम घेऊन पोबारा केला होता. पनवेल तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पाटील, पोलिस निरीक्षक गुन्हे जगदीश शेलकर, सहायक पोलिस निरीक्षक अनिरुद्ध गीजे, पोलिस उपनिरीक्षक हर्षल राजपूत, विजय देवरे, सुनील कुदळे, राजकुमार सोनकांबळे यांनी आठ आरोपींपैकी पाच आरोपींना अटक केली.

दिवसा नोकरी अन् रात्री दरोडे अशी या दरोडेखोरांची काम करण्याची पद्धत होती. या गुन्ह्यातील आणखी तीन आरोपींचा शोध सुरू आहे. यातील रोहन उर्फ गुड्डू गोपीनाथ नाईक हा सराईत गुन्हेगार असून त्याने यापूर्वी पनवेल तालुका पोलिस ठाणे येथे दोन, खालापूर येथे एक जबरी चोरी आणि दरोड्याचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील आरोपी हे दिवसा अन्य ठिकाणी नोकरी करायचे आणि रात्री मौजमजेसाठी एक्सप्रेस हायवेवर नागरिकांना लुटायचे अशी माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon