गर्लफ्रेंडला इंप्रेस करण्यासाठी थेट सलमान खानच्या वडिलांना धमकी, एकाला अटक

Spread the love

गर्लफ्रेंडला इंप्रेस करण्यासाठी थेट सलमान खानच्या वडिलांना धमकी, एकाला अटक

योगेश पांडे/वार्ताहर 

मुंबई – बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याला लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीकडून अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. काही महिन्यांपूर्वीच त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गोळीबार झाला होता. नंतरही हे धमक्यांचे सत्र सुरू आहेच.त्यातच बुधवारी सलमानचे वडील आणि प्रख्यात लेखक सलीम खान यांना एका बुरखाधारी महिलेकडून धमकी देण्यात आली. १८ सप्टेंबर रोजी सलीम खान मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले असताना एक अनोळखी महिला त्यांच्याकडे आली आणि लॉरेंस बिश्नोई को भेजूं क्या? असे विचारत तिने त्यांना धमकी दिली. सलमान खानचे वडील, सलीम खान हे १८ सप्टेंबर रोजी सकाळी ८. ४५ च्या सुमारास बँडस्टँड येथे मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. थकल्याने ते एका बिल्डिंगच्या समोर असलेल्या कट्ट्यावर बसले. तेवढ्यात गॅलेक्सी बिल्डींग येथून बँड स्टॅन्डच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरून एक स्कूटी तेथे आली, त्यावर एक स्कूटीचालक आणि मागे एक बुरखाधारी महिला बसली होती, त्यांनी यू-टर्न मारला आणि ते सलीम खान यांच्याजवळ आले. स्कूटी थांबवून “लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या” असा प्रश्न त्यांनी धमकीच्या स्वरूपात विचारला आणि लगेच स्कूटी सुरू करून ते तिथून निघून गेले.

त्यांनी स्कूटीचा नंबर पाहण्याचा प्रयत्न केला, मात्र तो पूर्ण दिसला नाही, पण त्यातील काही आकडे ७४४४ असल्याचे त्यांना दिसले. त्यानंतर सलीम खान यांच्या वतीने वांद्रे पोलीस ठाणे गाठून या प्रकरणाची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून एका व्यक्तीला अटक केली आहे. सलीम खान यांना धमकी देणारी महिला एकटी नव्हती तर एक पुरुषही तिच्यासोबत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलीम खान जिथे मॉर्निंग वॉक करत होते तिथेच मागून स्कूटरवरून दोन जण आले. त्यापैकी एकाने बुरखा घातला होता. बुरखा घातलेली व्यक्ती पुरुष नसून महिला असल्याचे तपासात समोर आले आहे. सलीम खान यांच्याजवळ स्कूटी थांबली आणि महिलेने त्यांना धमकी दिली. सलीम खान काही बोलण्यापूर्वीच ते दोघे तिथून फरार झाले. पोलिसांनी याप्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने तपास करू सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने एकाला अटक केली.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला आरोपी हा किरकोळ गुन्हेगार आहे. तसेच मुंबई पोलिसांनी बुरखा घातलेल्या महिलेलाही ताब्यात घेतले आहे. ही बुरखाधारी महिला, त्या स्कूटर चालवणाऱ्या इसमाची गर्लफ्रेंड होती असे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. तिच्यावर इंप्रेशन पाडण्यासाठीच त्याने बॉलिवूडच्या भाईजानला धमकी देण्याचा प्लान आखला होता. मात्र याप्रकरणी पोलिस सर्व बाजूंनी तपास करत असून चौकशी सुरू आहे. यापूर्वीही जूनमध्ये सलमान खान आणि सलीम खान यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यांच्या घरी पत्र पाठवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यावर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करत लमान आणि सलीम खान यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. तर काही महिन्यांपूर्वी सलमान खान याच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील सलमानच्या घरावर दोन तरूणांनी पहाटे गोळीबार केला होता, यामुळे मोठी खळबळ माजली. लाॅरेन्स बिश्नोईच्या भावानेच या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon