पोलिसाच्या वर्दीला काळिमा ! परपुरुषासोबत संबंध ठेवण्यासाठी मित्राच्या पत्नीवर महिला पोलिसाचा दबाव

Spread the love

पोलिसाच्या वर्दीला काळिमा ! परपुरुषासोबत संबंध ठेवण्यासाठी मित्राच्या पत्नीवर महिला पोलिसाचा दबाव

योगेश पांडे/वार्ताहर 

पुणे – पुणे पोलीस दलात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुणे पोलीस दलातील एका महिला कर्मचाऱ्यानेच गुन्हा केला आहे. मित्राच्या पत्नीला परपुरुषासोबत शारिरिक संबंध ठेवणाचा आग्रह त्या महिला कर्मचाऱ्याने केला. तसेच शारिरीक संबंध ठेवले नाही तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला जीवे मारण्यात येईल. मी पुण्याची लोकल आहे. माझी गुंडासोबत ओळख आहे, असे म्हणत धमकवले. या प्रकरणाची तक्रार मिळाल्यानंतर पुणे पोलीस आयुक्तांनी कारवाई करत त्या महिला पोलिसाचे निलंबन केले आहे. अनघा ढवळ असे आरोपी महिला पोलिसाचे नाव आहे. पुणे पोलीस दलातील कोथरुड वाहतूक पोलीस शाखेत अनघा सुनील ढवळे पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे. तिने तिच्या मित्राच्या पत्नीवर पुरुषाबरोबर संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला. जर तू परपुरषाबरोबर शारीरीक संबंध ठेवले नाही तर तुला आणि तुझ्या घरच्या लोकांना ठार करु, अशी धमकी दिली. आम्ही एक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ब्लॅकचे व्हाईट मनी करतो. त्यात ९ कोटींचा व्यवहार झाला आहे. त्यातील तुझ्या नवऱ्याला ४० ते ५० लाख रुपये मिळणार आहेत, असे अनघा ढवळे हिने त्या पीडित महिलेस सांगितले.

अनघा ढवळे हिची इन्स्टास्टार म्हणूनही ओळख आहे. सोशल मीडियावर ती सक्रीय असते. पीडित महिलेने याबाबत गडहिंग्लज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून आता पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत तिच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. अनघा ढवळे हिच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पुणे पोलीस दलातील कर्मचाऱ्याने हा प्रकार केल्यामुळे पोलीस दलात काय सुरु आहे? जर पोलीस धमक्या देऊ लागले तर सर्वसामान्यांचे काय होणार? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon