अंबड पोलीसांनी घरफोडी चोरी करणा-या आरोपीला केले जेरबंद, लाखोंचा मुदद्देमाल हस्तगत

Spread the love

अंबड पोलीसांनी घरफोडी चोरी करणा-या आरोपीला केले जेरबंद, लाखोंचा मुदद्देमाल हस्तगत

पोलीस महानगर नेटवर्क

नाशिक – अंबड पोलीस ठाणे, नाशिक शहर येथे दि. १४ ऑगस्ट, २०२४ रोजी फिर्यादी निलेश सखाराम माळी रा. एन ४२/१९, लोकमान्य नगर, पवननगर, सिडको, नाशिक यांनी त्यांच्या घरी चोरी झाल्याबाबत तक्रार दिल्याने त्याच्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाणे येथे । गुरंन. ५३३/२०२४ भा. न्या. सं. कलम ३०५ (अ), ३३१ (३),३३१ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयातील अज्ञात आरोपी व चोरी गेले मालाचा शोध घेत असताना अंबड पोलीस ठाणेकडील, गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हयातील चोरी केलेला माल एक इसम शंभर एकर परीसरात विक्री करण्याकरीता येणार असल्याची बातमी मिळाल्याने सदर बातमी प्रमाणे गुन्हे शोध पथकातील सपोनि किरण रोंदळे, पोना परदेशी, पोशि संदिप भुरे, पोशि गाढवे, पोशि करंजे, अशांनी सदर परीसरात सापळा रचुन सराईत गुन्हेगार आरोपी गणेश विठ्ठल तांबारे, वय ६० वर्षे, रा. प्रसाद नगर, रो हाऊस नं. ०२, बुरकुले हॉल जवळ, सिडको, नाशिक यांस गुन्हयातील चोरी गेलेल्या मुद्देमालासह ताब्यात घेवुन त्यास अंबड पोलीस ठाण्यात आणुन गुन्हे शोध पथकाने त्यास विश्वासात घेवुन तसेच बुध्दी कौशल्याचा वापर करून तपास केला असता त्याने अंबड पोलीस ठाणे हद्दीत इतर सात ठिकाणी घरफोडी करून चोरी केल्याची कबुली दिली. गु.रं.न. अंबड पो.स्टे. गुरनं. ५३३/२०२४ भा.न्या.सं. कलम ३०५ (अ), ३३१(३),३३१(४)

जप्त मुद्देमाल

०५.४० मि.ली. ग्रॅम सोन्याचे कर्णफुल व १३४.६५ मि.ली. ग्रॅम वजनाचे चांदिचे दागिणे अंबड पो.स्टे. गुरनं.६७/२०२४ भादवि कलम ४५७,४५४, ३८०

अंबड पो.स्टे. गुरनं. १७५/२०२४ भादवि कलम ४५७,४५४,३८०, १६ ग्रॅम सोने व ०३ भार चांदी

अंबड पो.स्टे. गुरनं. २६३/२०२४ भादवि कलम ४५७,४५४,३८०, ४० ग्रॅम सोने व २० भार चांदी

अंबड पो.स्टे. गुरनं. २७६/२०२४ भादवि कलम ४५७,४५४,३८०,२५ ग्रॅम सोने

अंबड पो.स्टे. गुरनं. ४७२/२०२४, ०४ भार चांदी

भा.न्या.सं. ३०५ (अ), ३३१(३),३३१ (४), १५ भार चांदी

अंबड पो.स्टे. गुरनं. ५२३/२०२४ भा.न्या.सं. ३०५ (अ), ३३१(३),३३१ (४)

याप्रमाणे अंबड पोलीस स्टेशन मधील एकुण ०७ गुन्हे उघड करून एकुण ६,५२,४२०/- रू. किंमत मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०२ श्रीमती मोनिका राऊत, सहा पोलीस आयुक्त शेखर देशमुख, अंबड विभाग तसेच अंबड पोली ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पवार व पो.नि जे.बी. शिरसाठ (गुन्हे) यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे शोध पथकाचे अधिकारी सपोनि किरण सेंदळे, पोउनि झनकसिंग घुनावत, पोना परदेशी, पो.ना.४ जगझाप, पोशि करंजे, पोशि गाढवे, पोशि मते, पोशि भुरे, पोशि बोडके बारगजे यांनी केली आहे. गुन्हयाचा पुढिल तपास पोहवा अतुल बनतोडे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon