धक्कादायक ! तक्रार मागे घेण्यास नकार दिल्याने पत्रकाराला भोकसले, तिघांवर गुन्हा दाखल

Spread the love

धक्कादायक ! तक्रार मागे घेण्यास नकार दिल्याने पत्रकाराला भोकसले, तिघांवर गुन्हा दाखल

पोलीस महानगर नेटवर्क

पुणे – पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली आहे. सांस्कृतिक व विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेले पुणे आता अववल गुन्हेगारी शहर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. पुण्यात नुकताच पत्रकाराावर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तीन जणांनी त्याला भोसकून मारले. या घटनेप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, यश राजेश कंधार (२२), ओम राजेश कंधारे (१८), राजेश विठ्ठल कंधारे (५०) अशी आरोपीची नावे आहे. मे महिन्यात दाखल तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ही तक्रार मागे घेण्यास त्याने नकार दिला. पत्रकार राहुल अशोक बानगुडे असं हल्ला झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते एरंडवणे येथील रहिवासी आहेत.

१७ ऑगस्ट रोजी गणेश मंदिराजवळ भालेकर वस्ती येथे राहुल मोबाईलवर बोलत असताना यश कंधारे हा घटनास्थळी आळा. त्यांच्यात पूर्व वैमन्यासातून वाद सुरु झाला. याच दरम्यान कंधारे यांनी  बानगुडे यांना धमकी दिली. त्यानंतर कंधारे यांनी कोयता काढून पत्रकारावर हल्ला चढवत ‘तुझी तक्रार लवकर मागे घ्या, अन्यथा तुम्हाला परिणामांना सामोरे जावे लागेल. थोड्याच वेळाने इतर दोन जण आले. घटनास्थळी राहुलला बेदम मारहाण केली. पीडितेने पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु राजेश आणि ओमने त्याचा पाठलाग केला आणि मारहाण केली. राहुलवर चोरीची खोटी तक्रार दाखल करण्याची धमकी दिली. हल्ल्यात राहुल यांना हाताला आणि अंगावर दुखापत झाली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon