ए.टी.एम. कार्डची अदला बदली करून पैसे काढणाऱ्या आरोपीस हरीयाणातून केले जेरबंद
पोलीस महानगर नेटवर्क
जळगाव – येथील शिरपूर शहर पो.स्टे. गुरनं. ४१०/२०२४ भारतीय न्याय संहिता कायदा सन २०२३ चे कलम ३१८(४), ३१८(२) व ३(५) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील फिर्यादी-योगेंद्र तोताराम नाईक (४४) व्यवसाय – शेती रा.मोहिदा तांडा ता.चोपडा जि. जळगाव यांनी फिर्याद दिली की, दि.१७/०७/२०२४ रोजी दुपारी ०१.०० वाजेच्या सुमारास शिरपूर जि. धुळे शहरातील गुजराथी कॉम्प्लेक्स जवळील ए.टी.एम. मध्ये ते गेले असता त्यांचे मागुन दोन अनोळखी इसम ए.टी.एम.मध्ये आले. त्यांनी फिर्यादी यांना पैसे काढुन देण्याचे बहाण्याने फिर्यादीचे ए.टी.एम. हातचलाखीने अदला बदली करून फिर्यादीचे ए.टी.एम.द्वारे ठिकठिकाणी एकुण ७७,१६९/- रूपये रोख काढुन फिर्यादीचा विश्वासघात करून फसवणुक केली बाबत दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल आहे.
शिरपूर शहर पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी तपासचक्रे वेगाने फिरवुन गुन्हे शोध पथकाचे अंमलदारांमार्फत घटनास्थळ परिसरातील सी.सी.टि.व्ही फुटेज चेक करून अनोळखी व्यक्तींच्या वर्णना वरून शोध घेत असतांना अनोळखी व्यक्तींनी त्र्यंबकराज पेट्रोलियम, पनाखेड ता. शिरपूर जि.धुळे या पंपावर मालट्रक वाहनामध्ये डिझेल भरण्यासाठी डिझेल प्लास्टीक कॅन मध्ये भरून नेत असतांना सदर पंपातील सी.सी. टि.व्ही. कॅमेरामध्ये आरोपी व मालट्रक वाहन क्र.एच.आर.३८/ए.बी.९३०० असे दिसुन आल्याने सदर वाहनाचे क्रमांकावरून सदरचे वाहन हे फरीदाबाद राज्य-हरीयाणा येथील असल्याचे निष्पन्न केल्याने शोध पथकाचे अंमलदारांना फरीदाबाद राज्य-हरीयाणा येथे सुमारे ११०० कि.मी. अंतरावर रवाना केले असता त्यांनी फरीदाबाद राज्य-हरीयाणा येथे जावुन सदरचे वाहन हे पंडीत रोडवेज या ट्रांस्पोर्ट कंपनीचे असल्याचे व त्यावर वाहन चालक नामे-सद्दाम इसा खान वय ३० रा. झांडा ता.हतिण जि. पलवल राज्य-हरीयाणा असा असल्याचे निष्पन्न करून त्याचा शोध घेवुन त्यास शिताफीने ताब्यात घेतले असता त्याने व त्याचे साथीदार अकरम अली मोहम्मद व अकील याहा मौलवीसाब दोन्ही रा. झांडा ता.हतिण जि. पलवल राज्य-हरीयाणा असे असल्याचे कबुली दिल्याने त्यास शिरपूर शहर पो.स्टे.ला हजर करून त्याचेकडुन गुन्ह्यातील मालातील १०,०००/-रूपये रोख हस्तगत करून सदरचा गुन्हा उघडकीस आणुन उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक के.के. पाटील, पोउनि/रोशन निकम, डी.बी. पथकाचे पोहेकॉ ललीत पाटील, आखडमल, गोविंद कोळी, मनोज महाजन, योगेश दाभाडे, आरीफ तडवी, प्रशांत पवार, मनोज दाभाडे, भटु साळुंके व सचिन वाघ अशांनी मिळून केली आहे.