मिरा रोडमध्ये तब्बल दोन कोटीचे अंमली पदार्थ जप्त; विदेशी महिलेलाही अटक
योगेश पांडे / वार्ताहर
मीरारोड – मुंबई पोलिसांच्या कारवाईला मोठे यश आले आहे. पोलिसांनी वसई विरार पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीत अंमली पदार्थ विरोधी विभागाने एक भारतीय इसम आणि विदेशी महिला कडून दोन कोटीहून अधिकचे अंमली पदार्थ जप्त केलं आहे. अंमली पदार्थविरोधी कारवाईत पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत ही कारवाई केली आहे. काशिगाव या ठिकाणी ही कारवाई केली असून यात एक भारतीय पुरुष आणि एक विदेशी महिला असे दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी त्यांच्या कडे तब्बल २ कोटी १८ लाख रुपये किमंतीचा १ किलो ९० ग्रॅम एम.डी. हा अंमली पदार्थ मिळाला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आणखी काही गुप्त माहिती समोर येण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी पुरुष हा ३५ वर्षाचा असून त्याच्या सोबतची संशयित आरोपी ही ३५ वर्षाची दक्षिण आफ्रिकी वंशाची महिला आहे. दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर कलम २२, २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या अंमली विरोधी पथक पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून या प्रकरणात आणखी काही खुलासे होतात का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.