पुण्यात अल्पवयीन मुलींची मद्यपार्टी; १६ वर्षाच्या मुलीचा गळफास, तर मैत्रीण दारुच्या नशेत बेशुद्ध!
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – पुण्यातील येरवडा परिसरात दोन अल्पवयीन तरुणींच राहत्या घरात दारुपार्टी केली. मद्यप्राशन केल्यावर एका तरुणीने आत्महत्या दुसरी बेशुद्ध अवस्थेत आढळली. तरुणीच्या आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे. या घटनेचा पोलीस तपास सुरू आहे. पार्टी करणाऱ्या मुली अल्पवयीन असल्याची माहिती मिळत आहे. येरवडा भागातील धक्कादायक घटनेने संपूर्ण पुणे शहर हादरले आहे. आत्महत्या केलेल्या मुलीचे वय १६ आहे. येरवडा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तरुणी ११ वी मध्ये असून येरवडा भागात होती. सोमवारी सायंकाळी ती आणि तिच्या एका मैत्रिणीने आई भाजी आणण्यासाठी गेली असता घरात दारू पार्टी करायचे ठरवले आणि मद्यप्राशन केले. दरम्यान, मयत तरुणीच्या मैत्रिणीने त्याच भागात राहणाऱ्या एका तरुणाला रात्री ८ वाजता बोलावले होते. तो तरुण घरी पोहचताच त्याने एक तरुणी ओढणी वापरून गळफास लावलेल्या अवस्थेत त्याने पाहिले. यानंतर त्यानेच तिच्या आईला बोलवून आणले. त्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले. परंतु, त्यापुर्वीच तिचा मृत्यू झालेला होता.
मृत तरुणीची दुसरी मैत्रीण बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. तिच्या तोंडावर पाणी मारून उठवले, तेव्हा ती दारूच्या नशेत असल्याचे निष्पन्न झाले. तिला देखील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी पाहणी केली असता या दोघींनी दारू पार्टी केल्याचे समोर आले आहे. दारू पार्टीनंतर त्यांनी उलट्या देखील केल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र या तरुणीने आत्महत्या का केली हे अद्याप समजू शकलेले नाही. दोन महिन्यात पुण्यात घडलेल्या घटनांनवर नजर मारली असता पुण्यातील पोर्शे कार प्रकरण असो किंवा एफसी रोड वरील ड्रग्ज प्रकारणातदेखील अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. अल्पवयीन मुले पार्टीत सहभागी होतात. दारू किंवा कोकेनसारखे अमली पदार्थ असेल. अल्पवयीन मुलं नशेच्या आहारी जात असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय..