अकोल्यातील केडीया दरोड्या प्रकरणी २१ गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात गुन्हेगारास अटक
पोलीस महानगर नेटवर्क
अकोला – अकोला शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. अशीच एक घटना दि. २८ जून, २०२४ रोजी अकोला शहरातील प्रसिद्ध व्यवसायिक नंदकिशोर अमृतलाल केडिया यांच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकून दरोडेखोरांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटून फरार झाल्याची घटना ताजीच घडली आहे. या प्रकरणी अकोला पोलिसांनी त्वरित कारवाई करत २ जुलै रोजी मुख्य आरोपी सह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली होती. तर आज या प्रकरणातील कुख्यात गुन्हेगार हेमंत लुनियालाही स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय जवळच असलेल्या आळशी प्लॉट परिसरात दरोडा पडल्याने या घटनेने खळबळ उडाली होती. या दरोडेखोरांनी जणू अकोला पोलिसांनाच आव्हान देत हे कृत्य केल्याने पोलिसांनी या प्रकरणाचा त्वरित तपास सुरू केला होता. पोलीस उपनिरीक्षक मुकूंद देशमुख आणि पोलीस हवालदार निलेश खंडारे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक तपास आणि माहितीच्या आधारावर २ जुलै रोजी प्रकरणातील मुख्य आरोपी पुष्पराज याला सुरत येथून अटक केली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस गणवेश धारण करून दरोडा टाकणाऱ्या विनायक उर्फ विक्की दिलीप देवरे आणि सचिन अशोक शहा यांना अटक केली. यानंतरही या प्रकरणातील मुख्य सूत्रधार हेमंत लुनिया फरार होता. त्याच्यावर मध्यप्रदेशात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, अवैध अग्निशस्त्र बाळगणे, डेपो मधून डिझेल चोरी, अवैधरित्या दारू विक्री, पॅरोलवरून फरार राहणे असे २१ गुन्हे दाखल आहेत.
२८ जून रोजी झालेल्या दरोड्यातील इतर आरोपी अटक झाल्याची माहिती मिळाल्यावर हेमंत लुनियाने आपले दोन्ही मोबाईल बंद करून फरार झाला होता. त्यामुळे त्याला अटक करणे हे पोलिसांसाठी आव्हानात्मक बनले होते, मात्र अकोला पोलिसांनी हार मानली नाही. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हेमंत लुनियाचा तपास करत त्याचा मागोवा घेतला आणि अखेरीस आज त्याला अटक करण्यात यश मिळाले. त्याच्याकडून दरोड्यात वापरलेली पांढऱ्या रंगाची मारुती ईस्टीगा कार क्रमांक एमपी-०९- झेएम-८४६८ देखील जप्त करण्यात आली आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक बच्चनसिंह, अपर पोलीस अधीक्षक अभय डोगरे, यांनी अभिनंदन केले असून ही कारवाई २ अकोला गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या नेतृत्वात स्थानीक गुन्हे शाखा अकोला से पोउपनि, गोपाल जाधव, पो. अंमलदार, अब्दुल माजीद सुलतान पठाण, रविंद्र खंडारे, महेंद्र मलिये, अविनाश पाचपोर, वसीम शेख, खुशाल नेमाडे, गोकूळ चव्हाण, मोहम्मंद आमीर, शेया अन्सार साप्नील सोडकर प्रशांत कमलाकर, अक्षय बोबडे यांनी केली आहे.