धक्कादायक ! महिलेचे बेडरूममधील फोटो व्हायरल करण्याची धमकी; दोघांना बेड्या
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – विद्येचे माहेरघर म्हणून पुण्याची ओळख आहे, पण सध्या ही ओळख पुसली जात असून दररोज काही ना काही गुन्हे घडत आहेत.पुण्यात महिलांवर अत्याचार होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. दोन महाभागानी विवाहित महिलेच्या घरी येऊन तिच्या नकळत बेडरुममधील फोटो काढले. ते फोटो महिलेला दाखवून फिरायला येण्याची मागणी करण्यात आली आणि नाही ऐकले तर पतीला व मुलाला जीवे मारण्याची धमकी देत ब्लॅकमेल करण्यात आले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जानेवारी २०२४ ते ८ जून या कालावधीत कात्रज परिसरात घडला आहे. याबाबत ३० वर्षीय विवाहित महिलेने सोमवारी (दि.१७) रोजी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन देवीदास विठ्ठल बिराजदार (वय-४०), धिरज पाटील (दोघे रा. कात्रज) यांच्यावर आयपीसी ३५४, ३५४(ब), ३५४(ड), ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींना सीआरपीसी कलम ४१ नुसार नोटीस दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बिराजदार याने फिर्यादी यांच्या घरी येऊन त्यांच्या नकळत बेडरुममधील फोटो काढले. ते फोटो महिलेला दाखवून मी सांगेल तेंव्हा माझ्यासोबत फिरायला यायचे आणि नाही ऐकले तर तुझ्या नवऱ्याला व मुलाला मारून टाकेन अशी धमकी दिली. तसेच महिलेला शरीरावर टॅटू काढण्यास भाग पाडले. आम्ही सांगू तसे वागायचे नाहितर फोटो पतीला दाखवण्याची धमकी बिराजदार आणि पाटील यांनी महिलेला दिली. पिडीत महिला बाहेर गेल्यानंतर तिचा पाठलाग करुन तिच्या सोबत गैरवर्तन केले. आरोपींच्या धमकीला घाबरून महिलेने तक्रार केली नाही. मात्र, आरोपींकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करुन नोटीस दिली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.