दिल्ली विमानतळावर बॉम्बची धमकीने खळबळ; प्रवाशांनी ‘इंडिगो’ विमानाच्या खिडकीतून मारल्या उड्या

Spread the love

दिल्ली विमानतळावर बॉम्बची धमकीने खळबळ; प्रवाशांनी ‘इंडिगो’ विमानाच्या खिडकीतून मारल्या उड्या

योगेश पांडे – वार्ताहर 

नवी दिल्ली – दिल्ली विमानतळावर मंगळवारी सकाळी अचानक गोंधळ उडाला. अनेक सुरक्षा अधिकारी इकडे धावताना दिसले. लोकांना बाजूला होण्यास सांगण्यात आले आणि अचानक इंडिगोच्या फ्लाइटच्या खिडकीतून लोक उड्या मारताना दिसले. दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या फ्लाइट 6E2211 मध्ये बॉम्ब असल्याचे समोर आले आहे. बॉम्बची धमकी समोर आल्यानंतर इंडिगोच्या क्रूने अलर्ट जारी केला आणि विमानातील सर्व प्रवाशांना विमानातून खाली उतरण्याची विनंती केली. बॉम्बची धमकी समजताच प्रवाशांमध्ये घबराट पसरली. काही प्रवाशांनी आपत्कालीन गेटवरून तर काहींनी फ्लाइटच्या खिडकीतून खाली उड्या मारायला सुरुवात केली. दिल्ली अग्निशमन सेवेने सांगितले की, सकाळी ५.३५ वाजता आम्हाला दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाली. बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर, इंडिगोच्या क्रूने अलर्ट जारी केला आणि प्रवाशांना विमानातून उतरण्याची विनंती केली. क्विक रिस्पॉन्स टीम घटनास्थळी पोहोचली. विमानाच्या आपत्कालीन गेटमधून सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.

दरम्यान, काही प्रवासी घाबरले आणि त्यांनी विमानातून खाली उड्या मारायला सुरुवात केली. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. उड्डाणाचे निरीक्षण करण्यासाठी त्याला विमानतळाच्या एका रिकाम्या भागात नेण्यात आले. घटनास्थळी उपस्थित विमान सुरक्षा अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, टेक ऑफ करण्यापूर्वी दिल्ली वाराणसी इंडिगो फ्लाइटच्या क्रूला विमानाच्या टॉयलेटमध्ये एक चिठ्ठी सापडली ज्यावर ‘बॉम्ब’ लिहिलेले होते. या चिठ्ठीची दखल घेत क्रूने IGI विमानतळ प्रशासनाला अलर्ट केले आणि प्रवाशाला विमानातून खाली उतरवले. विमानतळ अधिकाऱ्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, विमान सुरक्षा आणि बॉम्बशोधक पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी उड्डाणाची बारकाईने पाहणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon