कपिल शर्मा शो’मध्ये काम देण्याचे अमिष दाखवुन विवाहित महिलेवर अत्याचार; तुळींज पोलीसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – सिनेसृष्टीला हादवरुन टाकणारी घटना सध्या समोर आली आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम कपिल शर्मा शोच्या नावाखाली एका महिलेची फसवणूक करुन तिच्यावर बलात्काराची घटना घडली आहे. नालासोपाऱ्यातील ही घटना असून त्या महिलेला घरी बोलावून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. दरम्यान या प्रकरणात तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंद सिंह असं या आरोपीचं नाव असून तो नालासोपारा येथे राहणारा होता. सिनेसृष्टीत खूप ओळख असून, कपिल शर्मा शोमध्ये काम मिळवून देतो असं आमिष दाखवुन या आरोपीने पीडितेला घरी बोलावून घेतलं. त्यानंतर २० मे रोजी त्याने तिच्यावर बलात्कार केला. तिने विरोध करण्याचा प्रयत्न केला पण त्याने तिला शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच या प्रकारबाबत कुठे काही बोलल्यास तिला जीवे मारण्याचीही धमकी त्याने दिली. या संपूर्ण प्रकारानंतर त्या पीडित महिलेने पोलीस स्थानक गाठले. तिने पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपीविरुद्ध कलम ३७६, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी आरोपी आनंद सिंह यालाही अटक केल्याची माहिती समोर येत आहे. तुळींज पोलीस स्थानकाच्या उपनिरीक्षक रोहिणी डोके यांनी सांगितलं की, कलाकार असल्याचा दावा करणाऱ्या आणि कास्टिंग डायरेक्टरसाठी काम करणाऱ्या आनंद सिंहला अटक केली असून त्याला गुरुवारी कोर्टात हजर करण्यात आले.
सोनी टिव्हीवरील द कपिल शर्मा शो हा मनोरंजनाचा निखळ कार्यक्रम मागील अनेक वर्षांपासून सुरु आहे. आता हा कार्यक्रम ओटीटी माध्यमांवरही आलाय. या कार्यक्रमात काम देतो, असं आमिष या नराधमाने त्या महिलेला दाखवलं. काम करण्याच्या इच्छेपायी ती महिलाही त्याच्या बोलण्याला फसली. त्याने २० मे रोजी तिला घरी भेटायला बोलावलं. त्याचवेळी तिच्यावर बलात्कार केला.