पुण्यात तरुणीला अश्लील शिवीगाळ करुन मारहाण, आरोपीला बेड्या
पोलीस महानगर न्यूज नेटवर्क
पुणे – तरुणीचा हात पकडून अश्लील वर्तन करणाऱ्या तरुणाला विरोध केला असता त्याने शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना मांजरी बुद्रुक परिसरात घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एका २२ वर्षीय तरुणावर विनयभंग व इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत १९ वर्षीय पिडीत मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पिडीतेच्या तक्रारीवरुन अनिकेत बाळासाहेब मोझे (वय-२२ रा. घुले नगर, मांजरी ब्रु.)
याच्यावर भा.द. वि. कलम ३५४, ३५४(अ), ३२३, ५०९, ३४ नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत तरुणी घुले नगर परिसरातून जात असताना आरोपीने तिचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने तिचा हात पकडला. मुलीने त्याला विरोध केला असता आरोपीने तिला अश्लील शिवागाळ करुन हाताने मारहाण केली तसेच स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.