अवैध बेकायदेशीर इमारती बनवणार्या बिल्डरांनी केले खान कंपाउंडला घाण कंपाऊंड
अवैध बेकायदेशीर इमारतीचे चेंबर तुटून सांडपाणी रोडवर, स्थानिक लोकांना आरोग्याचा मोठा धोका
हुसैन शेख / प्रतिनिधी
ठाणे : दिवा प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या खान कंपाउंड येथे अवैध आणि बेकायदेशीर इमारत बनविणारे बिल्डरांनी 90 फिट DP रोडला चेंबरचे सांडपाणी आणि कचरा टाकून मोठा गटारीमध्ये बदलला आहे, मागील 10 दिवसापासून या अवैध बेकायदेशीर इमारतींचे चेंबर तुटून सांडपाणी रोडवर वाहत आहे या चेंबर बनविण्यासाठी हे बिल्डर कसले ही प्रयत्न करत नाही या अवैध इमारतींचे चेंबर सरळ रोडच्या बाजूला बनविण्यात आले आहे त्यामुळे चेंबर तुटले की ओवरफ्लो झाल्यावर चेंबरचे सांडपाणी सरळ मेनरोडवर वाहत आहे ज्यामुळे हा मेन रोड गटार सारखं झाले आहे या सांडपाण्याची निकासी होत नसल्याने पाणी रोडवर जमा होऊन त्या पाणीत डासांची उत्पत्ती झाली आहे व घाण वास येत आहे त्यामुळे डेंगू आणि मलेरिया सारख्या आजार पसरण्याची दाट शक्यता आहे ह्यामुळे स्थानिक लोकांना आरोग्याच्या मोठा प्रश्न उभा राहिला आहे तसेच आता काही दिवसात पाऊस सुरू होणार आहे जर आताच या मेन रोडचा असा हाल आहे तर पावसाळ्यात काय परिस्थिती असेल याची कल्पना ही करू शकत नाही, जेव्हा हे अवैध बेकायदेशीर इमारती बांधली जात असते त्या वेळी बिल्डर गटार, चेंबरचे सांडपाणी कुठे सोडायची कचरा कुठे टाकायचे याची काहीही दखल घेत नाही फक्त लवकरात लवकर इमारत बनवून लोकाना विकून पैसे घेऊन पळून जात आहे जर या अवैध बेकायदेशीर इमारती बनवणार्या बिल्डरांना गटार, चेंबर बनविण्यासाठी आणि कचरापेटी ठेवण्यासाठी सांगितले जाते तर हे बिल्डर असे म्हणतात कि हे आमचे काम नाही हे काम महानगर पालिका प्रशासनाने करावी आम्ही आमच्या बिल्डिंग बनविण्याचे काम करणार. या अवैध आणि अनधिकृत बेकायदेशीर इमारत बनविणारे बिल्डरांनी चेंबर आणि गटाराचे व्यवस्थित काम ना केल्याने या अवैध इमारतींचे गटार आणि चेंबर तुटून सांडपाणी आणि कचरा रोडवर जमा झाल्याने आता खान कंपाउंडला घाण कंपाऊंड बोलण्याची वेळ आली आहे. या सर्व बाबींचा विचार करून स्थानिक दिवा प्रभाग समिती अधिकारी आणि ठाणे महापालिका आयुक्त या अवैध इमारतीवर कार्यवाही करून तुटलेल्या चेंबर, इतरत्र कुठेही फेकलेला कचरा उठविण्याचा प्रयत्न करणार हा मोठा प्रश्न आहे?