हनुमान चालीसा पठण भोवलं ; ९ मे रोजी राणा दाम्पत्य हाजीर हो – न्यायालय

Spread the love

हनुमान चालीसा पठण भोवलं ; ९ मे रोजी राणा दाम्पत्य हाजीर हो – न्यायालय

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी हनुमान चालीसा पठन करण्याचा अट्टहास करणाऱ्या राणा दाम्पत्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून आरोप निश्चिती प्रकरणी सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे.शनिवारी न्यायालयात सुनावणीवेळी अनुपस्थित राहिल्याने राणा दाम्पत्याला ९ मे रोजी हजर राहण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. अमरावतीतील भाजपच्या उमेदवार नवनीत राणा व त्यांचे पती रवी राणा यांनी एप्रिल २०२२ मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी हनुमान चालीसा पठणचा प्रयत्न करून सामाजिक वातावरण कलुषित केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात दोघांनी दोषमुक्ततेसाठी अर्ज केला मात्र सत्र न्यायालयाने तो फेटाळला.

आरोप निश्चितीवर सत्र न्यायालयात सुनावणी सुरू असून शनिवारी न्या. राहुल रोकडे यांच्या समोर सुनावणी होती.अमरावतीत मतदान असल्याने राणा दाम्पत्याने न्यायालयात हजेरीपासून सूट द्यावी असा अर्ज ऍड. शब्बीर शोरा यांच्यामार्फत केला. मतदानाचे कारण विचारात घेत न्यायालयाने दाम्पत्याला एक दिवस गैरहजर राहण्याची मुभा दिली. व ९ मेच्या सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश देत सुनावणी तहकूब केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon