पुणे तिथे काय उणे ! ड्रग्ज नंतर आता अवैध मद्य विक्रीवर धाड ; उडता पुणे 

Spread the love

पुणे तिथे काय उणे ! ड्रग्ज नंतर आता अवैध मद्य विक्रीवर धाड ; उडता पुणे 

पुणे – पुण्यातील गुन्हेगारांची परेड, ड्रग्स कारवाईनंतर आता अवैध मद्य विक्रीवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. पुणे ग्रामीण पोलिसांची अवैध व्यावसायावर मोठी छापेमारी केली आहे.  पुणे ग्रामीण पोलिसांनी शहराजवळच एक दोन हजार नाही तर तब्बल  तब्बल ९ हजार लिटर दारू जप्त केली आहे. उरुळी कांचन येथे पोलिसांची मोठी कारवाई केली आहे.

पुण्यातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलीस ऍक्टिव्ह मोड वर आहेत. आधी गुन्हेगारांची ओळख परेड नंतर आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्करीचा पर्दाफाश करत तब्बल ३ हजार ५०० कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त केल्यावर अवैध दारू तस्करांवर पोलिसांनी फास आवळला आहे. पुण्यातील ऊरुळी कांचन परिसरात अवैध दारू तयार करणाऱ्यांवर मध्यरात्री कारवाई करत तब्बल ९ हजार लीटर दारू नष्ट करण्यात आली तर दारू तयार करण्याचे साहित्य आणि रसायने जप्त करण्यात आले आहे.

पुण्याजवळील पिंपरी-चिंचवडमध्ये अवैध मद्य विक्री जोरात

पिंपरी-चिंचवडमध्ये अवैध दारू विक्री करणाऱ्या रेस्टॉरंट आणि बारचा सुळसुळाट सुरू आहे. याकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप हॉटेल असोसिएशनने केला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात २०० पेक्षा अधिक परवानाधारक रेस्टॉरंट आणि बार आहेत. परंतु, याहून अधिक अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या हॉटेलची संख्या जास्त असल्याचा आरोप होत असून याकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी सोयीस्कर दुर्लक्ष करत आहेत, असे बोललं जातं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon