ठाणे बाळकुम परिसरात चोरट्याने लाखोंच्या मुद्देमालावर केला हात साफ
ठाणे – घरी कुणीही नसल्याची संधी साधून चोरट्याने २ लाख ६१ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांसह रोख रकमेवर हात साफ केला. धाडसी घरफोडीची घटना शनिवारी (ता.२४) सकाळी पावणेसात वाजता बाळकुम पाडा नं.१ या परिसरात घडल्याने एकच खळबळ उडाली.
या परिसरात राहणारी महिला (वय ३५, रा. बाळकुम पाडा नं.१,ठाणे पश्चिम) यांच्या घरात ही चोरी झाली. घर बंद असल्याने अनोळखी चोरट्याने कुलप कोंडा तोडून आत प्रवेश केला.
घरात असलेल्या कपाटांतील सोन्याचे वेगवेगळे दागिने व रोख रक्कम असा एकूण २ लाख ६१ हजार रुपयांच्या मुद्देमालावर हात साफ केला. याप्रकरणी महिलेने कापूरबावडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून अनोळखी चोरट्यांविरुद्ध गुन्हा रजि.नं.|२५४/२०२४ भा.द. वि. कलम ४५४,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह. सदर गुन्ह्याचा तपास कापूरबावडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक काळे हे करीत आहेत