बुलढण्यात एटीएम चोरीतील प्रकरणी पोलिसांकडून कौतुकास्पद कामगिरी ; संपूर्ण मुद्देमाल हस्तगत
बुलढाणा – दि.७ जानेवारी रोजी मौजपूरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला गुन्हा रजि. नंबर ०६/२०२४ भादवि कलम ३९९, ४०२ सह आर्म ॲक्ट कलम ४/२५ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपींना आज रोजी मा. न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची दोन दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेतली असता आरोपींनी चोरलेल्या एटीएम चोरीचा गुन्हा तामगाव पोलीस स्टेशन ता संग्रामपूर जिल्हा बुलढाणा येथे दाखल करण्यात आलेला होता. त्या एटीएममध्ये १७ लाख ७८ हजार रुपये एवढी रक्कम होती. त्यातील एटीएम मशीन मौजपूरी पोलिसांनी काल जप्त करून एसबीआय बँकेचे अधिकारी पोलीस स्टेशन येथे बोलावून त्यांचे समक्ष इन कॅमेरा सदर एटीएम उघडून त्यातील रकमेची मोजदाद केली असता गुन्ह्यातील संपूर्ण मुद्देमाल १७ लाख ७८ हजार रुपये जशी च्या तशी हस्तगत करण्यात आली.
तामगाव पोलिसांनी तत्परता दाखवत गुन्हेगारापर्यंत लागलीच पोहचल्याने आरोपींना एटीएम फोडून त्यातील रक्कम काढता आली नाही. सदर कामगिरी सपोनि मिथुन घुगे, पोउनि राकेश नेटके, सपोउनि प्रकाश जाधव, पोह नितीन खरात, पोह कोरडे, खरात, देशमुख, वाघ, बिरादार, नागरे, कोकणे, बाजड, शिवणकर, म्हस्के, वाघमारे, प्रदीप पाचारणे, अविनाश मान्टे आदींनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.