चेंबूर, अझिझ बाग, आझाद नगर मधील महानगरपालिकेच्या शाळेजवळ असलेले गार्डन बनले दारूड्या व गर्दूल्यांचा अड्डा
शांताराम गुडेकर / मुंबई
चेंबूर – चेंबूर येथील अझिझ बाग, आझाद नगर येथे महानगरपालिकेची शाळा आहे. या शाळेचा बाजूला मुलांना खेळण्यासाठी गार्डन आहे. मात्र खेळण्यासाठी असलेले हे गार्डन सद्यस्थितीत बनले आहे दारूचा आणि गर्दूल्यांचा अड्डा बनले आहे. येथे रोज सकाळी जेष्ठ नागरिक सकाळची व्यायम करण्यासाठी येतात. शिवाय येथे शाळेची मुलेही खेळण्यासाठी येत असतात. पण दारुडे दारू पिऊन तिथे बाटल्या फोडुन टाकतात त्यामुळे मुलांना आणि जेष्ठ नागरीकाना चालण्यासाठी मोठी आडचन होत आहे. गार्डनमध्येतर नाही वाचमन दिसत किंवा नाही सफाई कामगार दिसत. त्यामुळे येथे कचऱ्याचे साम्राज्य दिसत असून सुरक्षाही वाऱ्यावर आहे. काही जागृत नागरिकांनी जवळ असलेल्या आर.सी.एफ पोलीस स्टेशनला तक्रार केली तरीसुद्धा परिस्थिती आहे तशीच आहे. तरी संबंधित पालिका अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी या समस्याकडे गांभीर्याने पहावे. आवश्यकता असलेल्या सर्वं सुविधा उपलब्ध कराव्यात असे मत तेथील जेष्ठ नागरिक अमोल कदम यांनी बोलताना व्यक्त केले.आर.सी.एफ पोलीस यांनी याकडे लक्ष देऊन दारुडे, गर्दूले यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जेष्ठ नागरिकांकडून होत आहे.