खोणी पलावा या हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये एमडी ड्रग्सची कारवाई
मानपाडा पोलिसांनी दोन आरोपींना केली अटक
दिनेश जाधव : डोंबिवली
डोंबिवली : पुणे नाशिक, सोलापूर मुंबई नंतर आता डोंबिवली मध्ये एम डी ड्रग्सची कारवाई डोंबिवली खोणी मधील हाय प्रोफाईल सोसायटी परिसरामध्ये दोन इसम एमडी ड्रग्स विकण्यासाठी आले असता मानपाडा पोलिसांना खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार अडीज लाखांसह लाखो रुपयांचे ड्रग्स पोलिसांनी हस्तगत केले या घटनेमुळे हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
खोणी पलावा या हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये राहणारे आर्षद करार खान, शादाबुद्दीन सय्यद हे आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून खोणी पलावा या ठिकाणी राहत होते मात्र येथे अमली पदार्थाचा व्यवसाय करत असल्याचे स्थानिकांना माहिती मिळाली त्यानुसार स्थानिकांनी सापळा रचत पोलिसांना माहिती दिली आणि त्या माहितीनुसार खोणी पलावा येथे छापा टाकत या दोघांना पोलिसांनी पाच लाखांच्या मुद्देमालासह रंग हात अटक करण्यात आले.
60 ग्रॅम ड्रग्स सह अडीच लाख पोलिसांनी हस्तगत केले आहेत मात्र या या कारवाईदरम्यान इंडियन केमिकल एजन्सी दहिसर मुंबई या कंपनीचे बंद पॉकेट मिळाले असून या अनुषंगाने पोलीस तपास सुरू आहे
दरम्यान आरोपी राहत असलेल्या ठिकाणी घरमलकाची चौकशी करणार आहेत.
राज्यामध्ये वेगळ्या जिल्ह्यांमध्ये अमली पदार्थांवर कारवाईचे सत्र सुरू असतानाच आता डोंबिवलीमध्ये देखील अमली पदार्थ जप्त केल्याने पुन्हा एकदा ड्रग्स माफिया चर्चेत आले आहेत