डोंबिवलीत धाडसी घरफोडी, ४ लाख ३२ हजारांहुन अधिक मुद्देमाल लांबविला

Spread the love

डोंबिवलीत धाडसी घरफोडी, ४ लाख ३२ हजारांहुन अधिक मुद्देमाल लांबविला

पोलीस महानगर नेटवर्क

डोंबिवली – डोंबिवली पूर्व येथील वर्कशॉपच्या भिंतीचा पत्रा उचकटून आत प्रवेश करून वर्कशॉपमधील एकूण ४ लाख ३२ हजार ८४६ रूपयांचा मुद्देमाल चोरून चोरट्यांनी पोबारा केला आहे.ही घटना दि. २४ मार्च ते २६,मार्च २०२४ रोजी घडली आहे.

याबाबत मानपाडा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, डोंबिवली पूर्व येथील फिर्यादी आनंद शंकर राजगुरू (४२), व्यवसाय- व्यवस्थापक, रा. सोनारपाडा, डोंबिवली पूर्व हे काम करीत असलेल्या आछू प्रेसेशन प्रा.लि. या कंपनीच्या विनोद म्हात्रे चाळ, गाळा नं.४, डोंबिवली पूर्व येथे काम करतात. २४ मार्च ते २६ मार्च या दरम्यान अज्ञात चोरट्याने वर्कशॉपच्या मागील भिंतीचा पत्रा कोणीतरी अज्ञात चोरट्याने उचकटून त्यावाटे आत प्रवेश करून कॉपर मटेरियल व डिव्हीआर मॉडेल चोरी करून चोरट्याने पोबारा केला आहे.

याप्रकरणी फिर्यादी आनंद शंकर राजगुरू यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मानपाडा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर | ४९३/ २०२४ भा.द.वी. कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गांगुर्डे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon