मंडळ अधिकारी किरण राठोड आणि तलाठी चैत्राली कुटे यांना लाच स्वीकारताना अटक

Spread the love

मंडळ अधिकारी किरण राठोड आणि तलाठी चैत्राली कुटे यांना लाच स्वीकारताना अटक

पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे यांच्याकडून कारवाई

पालघर / विजय घरत 

पालघर – वडिलांच्या मालकीच्या जमिनीच्या सातबारावरील मयत नातेवाईकांची नावे कमी करून त्यांच्या वारसाची नावे नोंदवण्यासाठी दिलेल्या अर्जाची चौकशी करून ही दोन्ही कामे करून देण्यासाठी अर्जदारांकडे २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून २५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी किरण शंकर राठोड वय वर्ष (४७) मंडळ अधिकारी काने तालुका-वाडा, जिल्हा-पालघर यांच्यासह चैत्राली किशोर कुटे वय वर्ष (३४) तलाठी सजा काने तालुका-वाडा, जिल्हा-पालघर या दोघांना पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे यांच्या पथकाने मंगळवार दि. ३० जानेवारी २०२४ रोजी संध्याकाळी ४ वाजता हॉटेल कोकण किनारा वाडा-काने येथे अर्जदार यांच्याकडून पंचा समक्ष लाच स्वीकारताना रंगेहात अटक करून त्यांच्याविरुद्ध वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील लोखंडे, अप्पर पोलीस अधिक्षक अनिल घेरडीकर व सुधाकर सुराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधीक्षक दयानंद गावडे, पोलीस निरीक्षक शिरीष चौधरी, पोलीस हवालदार दीपक सुमडा, पोलीस हवालदार अमित चव्हाण, पोलीस हवालदार संजय सुतार, पोलीस हवालदार नवनाथ भगत, पोलीस हवालदार नितीन पागधरे, पोलीस हवालदार योगेश धारणे, पोलीस हवालदार विलास भोये, महिला पोलीस हवालदार निशिगंधा मांजरेकर, आणि पोलीस शिपाई जितेंद्र गवळे, पोलीस शिपाई सखाराम दोडे या पथकाने यशस्वीरित्या पार पडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon