आळंदीत वारकरी महाराजांवर पोस्को; तीन अल्पवयीन वारकरी विद्यार्थ्यांवर अत्याचार

Spread the love

आळंदीत वारकरी महाराजांवर पोस्को; तीन अल्पवयीन वारकरी विद्यार्थ्यांवर अत्याचार

पुणे – आळंदीतील एका नामांकित वारकरी संस्थेत तीन विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी ५२ वर्षीय संस्थाचालकास पोलिसांनी अटक केली आहे. पालकांनी केलेल्या तक्रारीवरून आळंदी पोलीस ठाण्यात दासोपंत उर्फ स्वामी हरिभाऊ उंडाळकर याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर १९/२०२४ कलम भादंवि ३७७ व बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम ४, ५ (एफ), ६, ८, १० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित वारकरी संस्था ही खूप जुनी असून अलीकडेच ती नोंदणीकृत देखील झाली आहे. मृदुंग वादनाच्या शिक्षणासाठी ही संस्था प्रसिद्ध असून आत्तापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी या संस्थेतून शिक्षण घेतले आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित संस्था चालवणाऱ्या तथाकथित महाराजाला ताब्यात घेतले असून त्याची वैद्यकीय तपासणी करून अटकेची कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती आळंदी पोलिसांनी दिली. या प्रकारामुळे आळंदी परिसरात तीव्र संतप्त तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी या प्रकरणी सखोल तपास करून दोषी व्यक्तीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon