पार्थ पवार व कुख्यात गुंड गजा मारणे यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ

Spread the love

पार्थ पवार व कुख्यात गुंड गजा मारणे यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार व कुख्यात गुंड गजा मारणे यांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भेटीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर आणि माजी महापौर दत्ता धनकवडे हे उपस्थित होते.

गजानन मारणे हा मारणे टोळीचा म्होरक्या आहे. त्याच्यावर सहा पेक्षा अधिक खुनांचे गुन्हे दाखल आहेत. गजा मारणे याने निवडणुकीच्या तोंडावर पार्थ पवार यांची सपत्नीक भेट घेतली. गजा मारणे यांच्या पत्नी जयश्री मारणे ह्या माजी नगरसेविका आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon