बहिणीची छेड काढली म्हणून भावाने जामिनावर सुटलेल्या गुन्हेगाराचा दगडाने ठेचून केला खून

Spread the love

बहिणीची छेड काढली म्हणून भावाने जामिनावर सुटलेल्या गुन्हेगाराचा दगडाने ठेचून केला खून

पुणे – पुण्यात गेल्या काही दिवसांपूर्वी कुख्यात गुंड शरद मोहोळ याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. हे प्रकरण ताजे असतानाच बहिणीची छेड काढली म्हणून जामिनावर नुकताच सुटून आलेल्या एका सराईत गुन्हेगाराचा खून करण्यात आला आहे. खून झालेल्या गुन्हेगाराचे नाव अरबाज उर्फ बबन इक्बाल शेख (३५,रा.भवानी पेठ) असे आहे.याप्रकरणी अधिक माहीती अशी की, बहिणीची छेड काढल्याचा कारणावरून एका तरुणाने गुंड अरबाज याचा खून केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. अरबाज विरोधात पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल होते. खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, मारहाण, विनयभंग असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे समर्थ आणि खडक पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्याच्याविरोधात झोपडपट्टी दादा प्रतिबंधक (एमपीडीए) कायद्यानुसार करण्यात आली होती. अरबाज नुकताच वर्षभरानंतर कारागृहातून बाहेर आला होता, त्यानंतरही तो स्थानिक नागरिकांना त्रास देत होता. या दरम्यान त्याने एका मुलीची छेड काढली असता मुलीच्या भावाने रागाच्या भरात अरबाज शेखचा खून केला. लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रियांका शेळके यांच्या सूचनेनुसार तपास पथकाने आरोपीस अटक केली, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon