पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून ८ आरोपींच्या मुसक्या आवळल्या

Spread the love

पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून ८ आरोपींच्या मुसक्या आवळल्या

जमीन व पैशांच्या वादातून खून झाल्याचा प्राथमिक अंदाज

पुणे – पोलिसांनी फिल्मी स्टाईलने संशयित मोटारींचा पाठलाग करीत शरद मोहोळ खून प्रकरणातील आठ आरोपींना सातारा जिल्ह्यातील शिरवळजवळ शस्त्रांसह अटक केली. जमीन आणि पैशांच्या जुन्या वादातून आरोपींनी मोहोळ याचा खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

पुणे पोलिसांनी रात्री उशिरा यासंदर्भात माहिती दिली. कुख्यात गुन्हेगार शरद मोहोळ याच्यावर शुक्रवारी गोळीबार करून आरोपी पसार झाले होते. गोळीबारात जखमी झालेल्या मोहोळला रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी कोथरूड पोलीस स्टेशन गुन्हा रजि क्रं २/२३ भारतीय दंड संहिता कलम ३०२, ३०७, ३४ सह भारतीय हत्यार कायदा कलम ३,२५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१),(३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याच्या तपासात पुणे शहर गुन्हे शाखेची ९ तपास पथके पुणे शहराच्या परिसरात आणि पुणे ग्रामीण, सातारा व कोल्हापूरच्या दिशेने रवाना करण्यात आली होती. त्या दरम्यान पुणे-सातारा रोडवर किकवी – शिरवळ दरम्यान तपासात निष्पन्न झालेल्या संशयित स्विफ्ट गाडीचा पाठलाग करून ८ आरोपी, ३ पिस्टल, ३ मॅगझीन, ५ राउंड व २ चार चाकी गाड्या ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत. सदरचा गुन्हा हा शरद मोहोळ बरोबर असलेल्या जमिनीच्या व पैशाच्या जुन्या वादातून आरोपींनी केला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सदरची कामगिरी पुणे शहर गुन्हे शाखेने कारवाई करून घटनास्थळी गोळीबार करणाऱ्या व त्यांना मदत करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon