
करणी बाधा दूर करते सांगून वयोवृद्धाची फसवणूक करणारी महिला गजाआड
दिनेश जाधव : डोंबिवली
तुमच्या घरावर करणी बाधा झाली असून मी तुम्हाला ही करणी बाधा दूर करण्यासाठी मदत करते असे सांगून वयोवृद्धाची लूट करणाऱ्या एका महिलेला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेकडून 15 लाख 87 हजार 700 रुपयाचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, तसेच वस्तू हस्तगत करण्यात आल्या आहेत. दरम्यान यक्य गुन्ह्यात आणखी एक महिलेचा समावेश असून ती फरार आहे.
त्रिशा केळुसकर असे महिला आरोपीचे नाव असून तिला मदत करणाऱ्या महिलेचे नाव मारियम असे आहे. ज्येष्ठ नागरिकाच्या पत्नीचे निधन झाले असून मुलगा परदेशी राहत आहे. खोणी पलावा येथे घरात एकटेच राहत असल्याने त्यांनी जेवण बनवण्यासाठी आरोपी त्रिशा ला सांगितले. मात्र तिने वयोवृद्धांच्या एकटेपणाचा फायदा घेत तुमच्या घरावर कोणीतरी करणी केली असून एक आत्मा घरात फिरत असल्याचे सांगितले. तुमच्या जीवाला धोका असून तुमच्यावरील संकट मी मंत्र तंत्राच्या सहाय्यानेदू र करेन असा सांगून त्यांच्याकडून सोने चांदीचे दागिने मागून घेतले. त्यांना खार वाटल्याने त्यांनी हे दागिने तीला स्वतःहून काढून दिले. त्यांनतर त्यांना भुरळ घालून दोन दिवस तुमच्या दुसऱ्या घरी जाऊन राहा मी या घराची शांती करून घेते असे सांगितले. त्यानुसार ज्येष्ठ नागरिक त्यांच्या दुसऱ्या घरी राहण्यासाठी गेले. याचवेळी त्रिशाने सर्व घर लुटून नेले. ज्येष्ठ नागरिक घरी परत आल्यानंतर त्यांना लक्षात आले की आपली फसवणूक झाली आहे. तात्काळ त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र पोलिसांनी वेळीच पकवके उचल्याने त्रिशाला पोलिसांनी अटक करून तिच्याकडून सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे.
अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली आहे. अधिक तपास मानपाडा पोलीस करत असून मारियाम महिलेला शोधण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.