मानपाडा पोलिस ठाण्यातील पोलिसावर लाचखोरीचा गुन्हा

मानपाडा पोलिस ठाण्यातील पोलिसावर लाचखोरीचा गुन्हा

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने मागितली होती लाच

दिनेश जाधव : डोंबिवली

मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील प्रकरणात आपल्या वरिष्ठांनी सहकार्य केले आहे आणि ते यापुढे ते करतील. त्यासाठी 50 हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी करणाऱ्या एका पोलीस नाईक पदावरील कर्मचाऱ्याच्या विरोधात त्याच पोलीस ठाण्यात लाचखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितिन राठोड असे या पोलिसाचे नाव आहे. नाईक पदावर कार्यरत असलेला हा पोलिस पोलीस उप निरीक्षक मुसळे यांचा लेखनिक आहे. पोलीस उप निरीक्षक मुसळे यांच्याकडे एक गुन्हा तपासासाठी आला आहे. या गुन्ह्यातील आरोपीला आणि त्याच्या पत्नीला पोलीस उप निरीक्षक मुसळे यांनी सहकार्य केले आहे आणि ते यापुढेही सहकार्य करतील, असे पोलीस नाईक नितिन राठोड याने या प्रकरणातील आरोपीला सांगितले. मात्र त्यासाठी साहेबांना 50 हजार रुपये द्यावे लागतील, असेही त्याने सांगितले. या पैशांसाठी पोलीस नाईक राठोड यांनी आरोपीकडे तगादा लावला होता त्यामुळे आरोपीने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली या तक्रारीची प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक सुरेश चोपडे आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक शहानिशा केली. चौकशीदरम्यान पोलीस नाईक राठोड याने आरोपीकडे 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. आरोपी आणि पोलीस नाईक राठोड यांच्यात झालेले झालेल्या तडजोडी अंती 40 हजार रुपये देण्याचे ठरले. तपासादरम्यान 40 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याची नोंद मानपाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
error: Content is protected !!
%d bloggers like this: