पालिकेतील माजी मार्शलनेच पालिकेचा अधिकारी असल्याचा दावा करून वयोवृद्धाला लुटले

पालिकेतील माजी मार्शलनेच पालिकेचा अधिकारी असल्याचा दावा करून वयोवृद्धाला लुटले

दिनेश जाधव : डोंबिवली

रस्त्यावर धूम्रपान करणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाला दोन तरुणांनी महापालिकेचे अधिकारी असल्याचे बतावणी करत त्यांच्याकडून 7600 रुपयांची फसवणूक केल्याची घटना जुन महिन्यात घडली होती. याप्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात इस्मांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केल्यानंतर फसवणूक करणाऱ्या दोघांपैकी एकाला गजाआड केले असून हा आरोपी पालिकेत माजी मार्शल म्हणून काम करत होता. दरम्यान आरोपीकडून गुन्हयात वापरलेली शाईन मोटार सायकल नं. एम.एच.05 ED 9805 व रोख रक्कम 3800 रुपये हस्तगत करण्यात आलेले आहे.

उल्हासनगर येथील रमाबाई आंबेडकर सोमनाथ बाबूराव कांबळे (वय 27 वर्षे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. जून महिन्यात पालिकेचे धिकरी आहोत असे सांगत रस्त्यावर धूम्रपान करत असल्याने दंड भरा असे एका वयोवृद्ध माणसाला सांगितले. त्यांनतर वयोवृद्ध माणसाने 7600 रुपये दिले मात्र संशय आल्याने त्याने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी गोपनीय बातमीदाराव्दारे तसेच मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजव्दारे पोलीसांनी तपास केला असता 24 जुलै रोजी एका आरोपीस उल्हासनगर येथून सापळा रचुन अत्यंत शिताफीने पकडले. त्याला ताब्यात घेवून त्याच्याकडे कसून तपास केला असता, त्याने आपण पालिकेत मार्शल म्हणून काम करत होतो. मात्र त्यानंतर झटपट पैसे मिळवण्यासाठी आपल्या एका मित्राच्या मदतीने मोटारसायकलवर हा गुन्हा केल्याचे त्याने कबूल केले. आपल्या परिसरात महानगरपालिका किंवा पोलीस अधिकारी असल्याचे बतावणी करून फसवणूक करणाऱ्या इसमां पासून सावध रहा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल कुऱ्हाडे, टिळक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग पिठे यांच्या मार्गदर्शनाखाली टिळक नगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. साथीदारचा शोध सुरू असल्याचे देखील पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
error: Content is protected !!
%d bloggers like this: