सिलिंडर स्फोटामुळे हादरली डोंबिवली

सिलिंडर स्फोटामुळे हादरली डोंबिवली

तीन जण जखमी 

दिनेश जाधव : डोंबिवली

डोंबिवली पश्चिमेकडील गायकवाड परिसरातील पारसनाथ इमारतीच्या तळमजल्यावरील एका घरात स्फोट होऊन घरातील मनीषा दोन वयोवृद्ध, एक 40 वर्षीय महिला, आणि एक 5 वर्षीय लहान मुलगा गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान हे सर्वजण खाजगी रुग्णालयात दाखल असून या घटनेची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली असून या वयोवृद्ध आजी आजोबांना मदत करण्यासाठी त्यांनी माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांना रुग्णालयात पाठवले.

मनीष मोर्वेकर (वय ६५) यांच्यासह घराजवळून जाणारे उरसुला लोढाया (वय ४०) आणि रियांश (वय ५) असे तिघे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पारस नाथ या इमारतीच्या तळमजल्यावर मनीषा मोर्वेकर आणि त्यांचे पती असे दोघेचजण राहतात. हे दोघेही वयोवृद्ध असून घरात गॅस गळती होऊन हा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तसेच विष्णुनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ही घटना संध्याकाळी साडेसातला घडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
%d bloggers like this: