सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या

सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या

महात्मा फुले पोलिसांची कारवाई 

दिनेश जाधव : कल्याण

चिकणघर येथे असणाऱ्या मोरया स्वीट अँड ड्रायफ्रुटच्या दुकानाचे शटर फोडून दुकानातील 32 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरणाऱ्या त्रिकुटाला महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान या आरोपींकडून ८ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी दिली.

खेमाणी उल्हासनगर इथे राहणारा मोहम्मद करीम उर्फ लाडो अख्तर अली बागवान, म्हारळगाव येथे राहणारा साकीर जाकीर खान (वय २०), जावसईगाव, अंबरनाथ (प) येथे राहणारा शिवम महेंद्र बतमा उर्फ मच्छी (वय २०) अशी आरोपींची नावे आहेत. चिकणघर येथे मोरया स्वीट आणि ड्रायफ्रूटचे दुकान आहे. या दुकानात गुरुवारी रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान चोरी करण्यात आली. दुकानातून 32 हजार 200 रुपयाच्या मुद्देमाल चोरी करण्यात आला. त्यानंतर या घटनेची तक्रार दुकान मालकाने महात्मा फुले पोलीस ठण्यात नोंदवली. सिसी टिव्ही सारख्या तांत्रिक बाबींचा आधार घेत पोलिसांनी त्रिकुटाला शोधून काढले आहे. दरम्यान आरोपी मोहमद करीम उर्फ लाडो अख्तरअली बागवान यांच्याकडून 7 हजार रुपये हस्तगत करण्यात आले असून त्याचा साथीदार साकीर जाकीर खान हा निष्पन्न झाल्याने सदर आरोपीचा कसोशिने शोध पथ त्याला गुन्हयात अटक करून त्याचेकडुन गुन्हयातील ५,०००/- रुपये रोख रक्कम, गुन्हयात वापरलेली स्कूटी कटव असे जप्त केले आहे. तर तिसरा साथीदार शिवम याच्याकडून 8 लाख रुपयाचे सोन्या चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. यांच्यावर बदलापूर पोलीस स्टेशन, अंबरनाथ पोलीस स्टेशन, मध्यवर्ती पोलीस स्टेशन, महात्मा फुले चौक पोलिस स्टेशन, विक्रोळी पोलीस स्टेशन येथे देखील गुन्हे नोंद असल्याचे समोर आले आहे. अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, कल्याण विभगाचे सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील, महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखली महात्मा फुले पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
%d bloggers like this: