कल्याण परिमंडळ झोन 3 मधील कल्याण डोंबिवली परिक्षेत्रातील एकूण आठ पोलीस स्थानकांमध्ये उघड झालेल्या चोरीच्या गून्ह्यांमधील एकूण 1 कोटी 50 लाख 99 हजार 41 रुपयांचा मुद्देमाल मालकाकडे सुपूर्त केला

कल्याण परिमंडळ झोन 3 मधील कल्याण डोंबिवली परिक्षेत्रातील एकूण आठ पोलीस स्थानकांमध्ये उघड झालेल्या चोरीच्या गून्ह्यांमधील एकूण 1 कोटी 50 लाख 99 हजार 41 रुपयांचा मुद्देमाल मालकाकडे सुपूर्त केला

दिनेश जाधव : कल्याण

कल्याण परिमंडळ झोन 3 मधील कल्याण डोंबिवली परिक्षेत्रातील एकूण आठ पोलीस स्थानकांमध्ये उघड झालेल्या चोरीच्या गून्ह्यांमधील एकूण 1 कोटी 50 लाख 99 हजार 41 रुपयांचा मुद्देमाल मालकाकडे सुपूर्त केला आहे. हा कार्यक्रम वायले नगर येथील साई हॉल येथे पार पडला. दरम्यान या गुन्ह्याची संख्य पाहता कल्याण मध्ये चोरीचे प्रमाण अधिक असले तरी जबरी चोरीचे प्रमाण डोंबिवली मध्ये अधिक असल्याचे दिसून येत आहे. डोंबिवलीतील एकूण चार पोलीस स्थानकातील 33 गुन्ह्यांमधील 1 कोटी 9 लाख 42 हजार 903 रूपयांचा मुद्देमाल मालकाकडे सुपूर्त करण्यात आला असून कल्याण विभागातून 47 गुन्ह्यांतील 41 लाख 56 हजार 138 रुपयांचा मुद्देमाल मालकाकडे सुपूर्त करण्यात आला. यावेळी उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभाग उमेश माने पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त डोंबिवली विभाग सुनील कुऱ्हाडे, महात्मा फुले पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने बाजारपेठ पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र पवार, खडकपाडा पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख, डोंबिवली पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर, मानपाडा पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे, टिळक नगर पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे, विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
%d bloggers like this: