
चारित्र्यावर संशय घेत संतापलेल्या पतीने पत्नीवर चाकूने हल्ला
कल्याण स्टेशन परिसरातील स्कायवॉक वरील धक्कादायक घटना
दिनेश जाधव : कल्याण
कल्याण चारित्र्यावर संशय घेत संतापलेल्या पतीने पत्नीवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक. घटना काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कल्याण स्कायवॉक वर घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलय. हल्ला केल्यानंतर पळून जाण्याच्या बेतात असणाऱ्या पती विकास पाटील याला नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी अटक केली आहे.
कल्याण जवळ आंबिवली येथे विकास पाटील आपल्या पत्नीसह राहत होता. आज रात्री कल्याण स्टेशन परिसरातील स्कायवॉक वरून दोघे पती पत्नी जात होते. विकास प्रविनाच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने विकास व प्रवीणामध्ये नेहमीच भांडण होत होते. आज रात्री नऊ वाजता कल्याणच्या स्कायवॉकवर दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. या वादातून संतापलेल्या विकासने प्रविणावर चाकूने हल्ला केला या हल्ल्यात प्रविणाच्या च मानेवर, गळ्यावर, छातीवर गंभीर दुखापत झाली आहे जखमी प्रवीनाला कल्याण मधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. दरम्यान विकास हा प्रविना जखमी झाल्याचे पाहून तेथून पळून जाण्याच्या बेतात होता मात्र पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने विकासला अटक आहे याप्रकरणी महात्मा फुले पोलीस पुढील तपास करत आहेत.