रेल्वे प्रवाशांचे पैसे आणि दागिने लांबविणारा अट्टल चोर गजाआड

रेल्वे प्रवाशांचे पैसे आणि दागिने लांबविणारा अट्टल चोर गजाआड

दिनेश जाधव : कल्याण

मेल एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांच्या पर्समधून पैसे आणि दागिने चोरणाऱ्या शहजाद सय्यद (30, रा. कल् घेयाण पत्रिपुल) या अट्टल चोरटय़ास कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत.

कल्याणहून कसारा आणि कजर्तच्या दिशेने जाणाऱ्या मेल एक्सप्रेसमध्ये काही दिवसापासून प्रवासी महिलांच्या पर्स चोरीच्या घटना वाढल्या होत्या. त्यानुसार कल्याण जीआरपी आणि कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच या चोरीच्या घटनांचा तपास करत होते. तेव्हा कल्याण रेल्वे स्थानकात सीसीटीव्ही फूटेजमध्ये एक संशयीत पोलिसांच्या नजरेत आला. काही दिवसापूर्वी हा संशयीत तिकडे फिरत असताना पोलिसांनी पाहिले होते. त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याचे नाव सांगितले. शहजाद सय्यद असे त्याचे नाव असून तोच या चोरी करत होता. शहजाद हा मूळचा अजमेर येथे राहणारा असून सध्या तो कल्याणच्या पत्रीपूल परिसरात भाडय़ाने खोली घेऊन राहत आहे. 2017 मध्ये अहमदाबाद पोलिसांनी शहजादला रेल्वेतील चोरीच्या प्रकरणात अटक केली आहे. हा देशभरात फिरून मेल एक्सप्रेसमध्ये प्रवास करुन महिलांच्या पर्सवर डल्ला मारतो. ही शहजादची चोरीची पद्धत असून त्याने कल्याण हद्दीत 13 चोऱ्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
error: Content is protected !!
%d bloggers like this: